"त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला...", प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंवर अभिनेत्रीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:15 IST2025-09-28T12:14:46+5:302025-09-28T12:15:24+5:30
सुभाष घईंवर अभिनेत्रीचे आरोप, नेमकं काय म्हणाली?

"त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला...", प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंवर अभिनेत्रीचा आरोप
सुभाष घई हे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आहेत. 'खलनायक','ताल','राम लखन','कांची' सारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. मात्र नुकतंच एका अभिनेत्रीने सुभाष घईंवरगंभीर आरोप लावला आहे. अभिनेत्री घईंच्या घरी गेली असता त्यांनी तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले. तसंच किस करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तिने लावला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
'सेक्रेड गेम्स' सीरिज तसंच 'हाऊस अरेस्ट' या रिएलिटी शोमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहल वडोलिया. सध्या नेहलने सुभाष घईंवर लावलेल्या आरोपांमुळे बीटाऊनमध्ये खळबळ उडाली आहे. गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहल म्हणाली, "सुभाष घईंच्या मॅनेजरला मी डेट करत होते. आमचं नवीनच रिलेशनशिप होतं. आमचं नातं कुठपर्यंत जातंय हे आम्ही बघत होतो. भेटत होतो. आमच्यात फिजिकल असं काहीही नव्हतं. एकदा त्याने तुला सुभाष घईंच्या घरी पार्टी हे तर यायचं आहे का विचारलं. मी होकार देत त्याच्यासोबत घईंच्या घरी गेले. मात्र पार्टीनंतर सुभाष घईंनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. आम्ही हॉलमध्ये ड्रिंक करत होतो. माझ्या हातून ग्लास पडला. मग त्यांनीच तो ग्लास उचलला. मग घई म्हणाले की मी तुम्हाला बाल्कनी दाखवतो. आम्ही बाल्कनीत गेलो. मी बाहेर व्ह्यू बघत होते तर घई माझ्याकडे एकटक बघत होते. ते अगदी माझ्या जवळ आले होते. मला खूप अनकंफर्टेबल वाटलं. ते मला म्हणाले,'तुझी स्माईल खूप सुंदर आहे. तू इंडस्ट्रीत खूप काही करु शकतेस. नाव कमावू शकतेस. तू हसतेस तेव्हा किती गोड दिसतेस. तू खूप सेक्सी आहेस'. मला विचित्र वाटलं. मी थँक यू म्हणाले आणि आम्ही पु्न्हा हॉलमध्ये आलो."
"नंतर मी आणि बॉयफ्रेंड दुसऱ्या खोलीत गेलो. मी वॉशरुमला गेले. बाहेर आले. मग माझा बॉयफ्रेंडही त्याच वॉशरुममध्ये गेला. जसा तो आत गेला सुभाष घई खोलीत आले. मी त्यांना पाहिलं. ते माझ्याच दिशेने येत होते. ते माझ्या इतक्या जवळ आले आणि किस करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्याबाजूने जात होते. त्यांचे ओठ माझ्या गालावर लागले. मी शॉक झाले. माझा बॉयफ्रेंड बाहेर आला तर घई एकदम काहीही झालं नसल्यासारखं तिथून गेले. मी बॉयफ्रेंडला सगळं सांगितलं आणि त्याच्यावर चिडले. मी म्हटलं तू मला कुठे आणलंय. आता माझा तुझ्यावरही विश्वास नाही. मी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. बॉलिवूडमध्ये असं जर काम मिळत असेल तर मी करणार नाही. मी तेव्हा २६ वर्षांची होते. ४ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी घाबरुन हे कोणालाच सांगितलं नव्हतं."