इटलीच्या रस्त्यावर फेरफटाका मारण्यात बिझी नेहा पेंडसे, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 11:40 IST2019-07-11T11:37:35+5:302019-07-11T11:40:17+5:30
नेहा काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. तिथे खूप एन्जॉय करत विविध स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेथील काही खास स्थळांचे फोटोही तिने आपल्या कॅमे-यात कॅप्चर केले आहेत.

इटलीच्या रस्त्यावर फेरफटाका मारण्यात बिझी नेहा पेंडसे, फोटो आले समोर
नेहा सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहाने पुन्हा एकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र यावेळी शेअर केलेल्या फोटोंची बात काही औरच आहे. कारण यावेळचे हे सगळे फोटो इटलीमध्ये क्लिक करण्यात आले आहे.
होय, नेहा काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. तिथे खूप एन्जॉय करत विविध स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेथील काही खास स्थळांचे फोटोही तिने आपल्या कॅमे-यात कॅप्चर केले आहेत. तसेच नेहमीप्रमाणे यावेळीही तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. नेहाने शेअर केलेल्या फोटोत तिने ऑरेंज कलरचा वनपीस परिधान केला असून व्हाईट कलरचे स्निकर घातल्याचे दिसतंय. तर दुस-या फोटोत रेड फ्लोरल ड्रेस घातला आहे तर तिस-या फोटोत ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे.
नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षः वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते. वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी तिने हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या त्या व्हिडीओला बऱ्याच कमेंट्स आणि लाईक्सही मिळाले होते.