अभिनेत्री मनिषा केळकर झळकणार या बॉलिवूड सिनेमात?दंबग पोलिस इन्सपेक्टर बनत अरबाज खानसह करणार रोमान्स अधिक जाणून घेण्यासाठी वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:29 IST2016-12-21T12:03:05+5:302016-12-21T16:29:22+5:30
आधी मराठी सिनेमात टाकलं दमदार पाऊल त्यानंतर 'फेंड रिक्वेस्ट' या सिनेमातून तामिळ सिनेसृष्टीतही तिने आपला जम बसवला आणि आता ...

अभिनेत्री मनिषा केळकर झळकणार या बॉलिवूड सिनेमात?दंबग पोलिस इन्सपेक्टर बनत अरबाज खानसह करणार रोमान्स अधिक जाणून घेण्यासाठी वाचा
सध्या अरबाज त्याच्या करिअरला घेवून नाही तर त्याची पत्नी मयालायकामुळेच जास्त चर्चेत होते. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांमध्येच अरबाजचे अस्तित्व दिसून आले.नुकताच सोहेल खान दिग्दर्शित 'फ्रिकी अली' सिनेमात अरबाज खान झळकला होता. या सिनेमानंतर कोणत्या सिनेमावर तो काम करतोय. याविषयी काही ठोस उत्तर न देणारा अरबाज खान आता नव्या सिनेमाच्या तयारीला लागलाय. मराठमोळा अंदाजातला अरबाज रसिकांचे कितपत मनोरंजन करतो हे पाहणेही रंजक ठरेल.
मनिषाने तेलगू सिनेमात एक्शन भूमिका साकारली होती.त्यासाठी फिटनेसवरही तिने बरीच मेहनत घेतली होती. मराठी तेलगू आणि बॉलिवूड अशा तिन्ही माध्यमात काम केल्यानंतर काय वेगळेपण जाणवते असा प्रश्न तिला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आला. त्यावेळी कुठल्याही सिनेसृष्टीची तुलना करणं योग्य होणार नाही. एखादी सिनेसृष्टी चांगली.. दुसरी वाईट असं नसतं.. ज्या लोकांसोबत काम करतो.. ज्या टीमसह वावरतो. ती टीम चांगली निवडावी,.. तर सिनेमा नक्कीच चांगला होतो असं मी समजते.असे मनिषा केळकरने सांगितले होते त्यानुसारच आता हिंदीतही ती आपले नशीब आजमवताना दिसणार आहे.