निर्मातीकडूनच आला कास्टिंग काऊचचा अनुभव, अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:40 IST2025-01-12T14:40:11+5:302025-01-12T14:40:47+5:30
कपूर कुटुंबाचेही आभार त्यांच्यामुळेच इंडस्ट्रीत... काय म्हणाली अभिनेत्री?

निर्मातीकडूनच आला कास्टिंग काऊचचा अनुभव, अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतला प्रकार
टीव्ही ते बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख मिळवणारी अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunickaa Sadanand). आजही ती विविध भूमिकांमधून समोर येते. तिने अनेका मालिका, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुरुवातीला ती बॉलिवूडमध्ये लीड हिरोईन व्हायचं स्वप्न घेऊन आली होती. मात्र कास्टिंग काऊचमुळे तिला अनेक सिनेमांमधून बाहेर पडावं लागलं. नुकतंच ती याविषयी भरभरुन बोलली.
तडजोड करण्यास नकार दिल्याने दोन सिनेमांमधून कुनिका सदानंदला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कुनिका म्हणाल्या, "दोन बिग बजेट सिनेमे ज्यातून मी बाहेर पडले. मोठे दिग्दर्शक होते, कलाकार तर खूपच सीनिअर होते ज्यांना मी वडिलांच्या नजेरेनेच बघायचे. माझी सहकलाकाराची भूमिका होती. पण मला तो रोल आवडला होता. माझे कपडेही ठरले होते. पुढच्या दिवशी माझी फ्लाईट होती. फ्लाईटचे पैसे घेण्यासाठी मी ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा सिनेमाची निर्माती जी मोठी महिला होती ती मला येऊन म्हणाली, 'बेटा मी काय करु, तू तर तडजोड करणार नाहीस. आता मी ४० दिवस त्यांना तिथे घेऊन जाऊन काय खायला घालू सांग. म्हणजे माझ्या २ भुकेल्या वाघांना मी खायला दिलं नाही तर काय होईल. हे ऐकल्यावर मी रडायला लागले होते."
त्या पुढे म्हणाल्या, "इंडस्ट्रीत बदल तेव्हा झाला जेव्हा करिष्मा कपूर आली. मी यासाठी कपूर कुटुंबाचे आभार मानते की त्यांनी करिष्माला इंडस्ट्रीत आणलं. तेव्हापासून हे प्रकार कमी झाले. रवीना टंडन, करिष्मा कपूर या हिरोईन आल्यामुळेच इंडस्ट्रीत हळूहळू बदल व्हायला लागला. मग उलट लोकच घाबरायला लागले."
कुनिका सदानंद यांनी 'बेटा', 'हम साथ साथ है', 'खिलाडी' यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी खलनायिकेच्याच जास्त भूमिका केल्या.