अभिनेत्री कॅटरिना कैफचे शेड्यूल झाले व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:24 IST2017-10-23T10:54:29+5:302017-10-23T16:24:29+5:30

कॅटरिना कैफचे शेड्यूल सध्या खूपच व्यस्त आहे. सलमान खानसोबत ती टायगर जिंदा है चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2012मध्ये ...

Actress Katrina Kaif's schedule is busy | अभिनेत्री कॅटरिना कैफचे शेड्यूल झाले व्यस्त

अभिनेत्री कॅटरिना कैफचे शेड्यूल झाले व्यस्त

टरिना कैफचे शेड्यूल सध्या खूपच व्यस्त आहे. सलमान खानसोबत ती टायगर जिंदा है चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2012मध्ये आलेल्या एक था टायगर चा सिक्वल आहे. सध्या या चित्रपटाचे डबिंगचे काम सुरु आहे. याच सोबत अनेक ब्राँडसोबत सुद्धा कॅटरिना काम करते आहे. 

त्याचसोबत शाहरुख खान स्टारर आनंद एल राय चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सुद्धा ती बिझी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2017-2018मध्ये येणाऱ्या तीन मोठ्या चित्रपटांचा कॅटरिना कैफ भाग बनणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमध्ये  कॅट आणि सलमानच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. सलमान खान आणि कॅटरिनाच्या जोडीचा 'टायगर जिंदा है' कडून दोघांना ही खूप अपेक्षा आहेत. आबु धाबीमध्ये 45 दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिना सलमानच्या जवळ आल्याची देखील चर्चा होती. तब्बल यानंतर कॅट कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्यामुळे रणवीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे. 

ALSO READ : रणबीर कपूरची स्मोकिंगची सवय सोडवण्यासाठी कॅटरिना कैफ त्याला परदेशात ही घेऊन गेली होती

काही दिवसांपूर्वीच कॅटरिना लंडनच्या एअरपोर्टवर हटक्या ड्रेसमध्ये दिसली होती. या ड्रेसची किंमत फक्त आठ हजार रुपये इतकिच होती. 

Web Title: Actress Katrina Kaif's schedule is busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.