अबब..! कंगना राणौत दिवसाला घेते इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून येईल भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 08:00 IST2020-09-09T08:00:00+5:302020-09-09T08:00:00+5:30
करिअरचा मागेपुढे विचार न करता सर्वांशी पंगा घेणाऱ्या कंगनाच्या दिवसाच्या मानधनाचा आकडा वाचून तुम्ही चक्रावून जाल.

अबब..! कंगना राणौत दिवसाला घेते इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून येईल भोवळ
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनापासून सातत्याने कंगना राणौत चर्चेत आहे. यादरम्यान तिने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी विरोधात बंड पुकारले होते. या प्रकरणाता ड्रग अँगल समोर येताच क्वीननं बॉलिवूडमधील ड्रग्सबाबतीत बरेच खुलासे केले. त्यात तिने नुकतेच मुंबईला पीओके म्हटल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यात आता कंगना आणि महाराष्ट्र सरकार असा सामना रंगला आहे. करिअरचा मागेपुढे विचार न करता सर्वांशी पंगा घेणाऱ्या कंगनाच्या दिवसाच्या मानधनाचा आकडा वाचून तुम्ही चक्रावून जाल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रूपये मानाधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार कंगना राणौत एका चित्रपटासाठी 11 कोटी रूपये मोजून घेते. याशिवाय अनेक जाहिरातीतही काम करते. तसेच एका दिवसाच्या प्रचारासाठी तिची फी दीड कोटी रूपये आहे.
फोर्ब्सच्या यादीत कंगना 70व्या स्थानावर
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत कंगनाचे स्थान 70 व्या क्रमांकावर होते आणि 2019 या वर्षभरात तिने 19 कोटी रूपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला होता.
फोर्ब्सच्या यादीवर संतापली कंगनाची बहिण रंगोली
फोर्ब्सने कंगनाचे उत्पन्न केवळ 19 कोटी दाखवल्यामुळे तिची बहिण रंगोलीदेखील संतापली आहे. फोर्ब्सची ही यादी बोगस आहे व हे सगळे पीआरवाल्यांचे काम आहे. त्यांनी कंगनाचे जेवढे उत्पन्न दाखवले आहे, तेवढा तर आपली बहिण टॅक्स भरते असा दावा रंगोलीने केला आहे. दरम्यान, कंगनाचे उत्पन्न यापेक्षा कैक पटीने जास्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र तिच्या अकाउंट विभागाशिवाय अन्य कोणाला याची माहिती नाही. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवली गेली आहे.
कंगनाने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ती स्वत: मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तसेच तिने अन्य ठिकाणीही मोठी रक्कम गुंतवली असल्याचा दावा करण्यात आला आहे.