Throwback: कुठे गायब झाली ‘परदेसी परदेसी’ गाण्यात दिसलेली ही अभिनेत्री?  आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 08:00 AM2020-01-24T08:00:00+5:302020-01-24T08:00:02+5:30

एकेकाळी अमजद खानसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्यात.

actress kalpana iyer affair with amjad khan managing restaurant in dubai | Throwback: कुठे गायब झाली ‘परदेसी परदेसी’ गाण्यात दिसलेली ही अभिनेत्री?  आता दिसते अशी

Throwback: कुठे गायब झाली ‘परदेसी परदेसी’ गाण्यात दिसलेली ही अभिनेत्री?  आता दिसते अशी

googlenewsNext
ठळक मुद्देकल्पनाचे पर्सनल लाईफही खूप गाजले. एकेकाळी अमजद खानसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्यात.

आमिर खानकरिश्मा कपूर यांच्या ‘राजा हिंदुस्तानी’  या चित्रपटातील ‘परदेसी परदेसी’ हे गाणे ऐकले नसेल, अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. या गाण्यात दोन अभिनेत्री आमिरसोबत थिरकताना दिसल्या होत्या.   या गाण्यात कल्पना अय्यर बंजारन महिलेच्या रूपात दिसली होती. ‘परदेसी परदेसी’ या गाण्याने कल्पना अय्यर एकदम प्रकाशझोतात आली होती. सध्या ही कल्पना कुठे आहे, तुम्हाला ठाऊक आहे?

 उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जन्मलेल्या कल्पनाने 70 च्या दशकात मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1978 साली मिस इंडिया स्पर्धेतील ती फर्स्ट रनरअप होती. त्यानंतर मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत पहिल्या टॉप १५ सेमी फायनलिस्टमध्ये स्थान पटकावून कल्पनाने सर्वांचे लक्ष वेधले आणि पाठोपाठ बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री झाली.

चित्रपटातील आयटम नंबर्सला कल्पनाने एक वेगळी ओळख मिळवून दिली.  परदेसी परदेसी,  मुझे जान से भी प्यारा है , कोई यहां नाचे नाचे  ही तिची गाणी तुफान लोकप्रिय ठरली. अनेक जाहिरातीत ती झकळली.

 आकर्षक आणि सेन्शुअल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कल्पना अय्यर केवळ अभिनेत्री नव्हती तर पॉप सिंगर अशीही तिची एक ओळख होती. आपल्या करिअरमध्ये तिने अनेक लाईव्ह शो केलेत. चंद्रकांता, बनेगी अपनी बात, गुब्बारे अशा जवळपास 75 टीव्ही मालिकांतही तिने काम केले.  १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या  हम साथ साथ है या चित्रपटात ती दिसली.

कल्पनाचे पर्सनल लाईफही खूप गाजले. एकेकाळी अमजद खानसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्यात. असे म्हणतात की, अमजद यांच्या मृत्यूनंतर कल्पनाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आजही ही अभिनेत्री अविवाहित आहे.

सध्या कल्पना दुबईत राहते. हम साथ साथ है या चित्रपटानंतर ती दुबईत गेली आणि तिथेच स्थायिक झाली. कल्पनाचे दुबईत एक मोठे रेस्टॉरंट आहे.
 
 

Web Title: actress kalpana iyer affair with amjad khan managing restaurant in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.