सलमान खानच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या अभिनेत्रीने आजवर केले नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 13:52 IST2017-10-19T08:22:33+5:302017-10-19T13:52:33+5:30
सलमान खानचे आजवर संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण गाजले आहे. ऐश्वर्यासोबत असलेल्या त्याच्या ...
.jpg)
सलमान खानच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या अभिनेत्रीने आजवर केले नाही लग्न
स मान खानचे आजवर संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण गाजले आहे. ऐश्वर्यासोबत असलेल्या त्याच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा आजही मीडिया मध्ये होते. आज त्याच्या आयुष्यात आलेल्या बहुतांश अभिनेत्री आयुष्यात सेटल झाल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का सोमी अली ही अभिनेत्री सलमानच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि तिने आजही सलमानमुळेच लग्न केलेले नाही.
सोमी अली केवळ पंधरा वर्षांची असताना सलमान आणि तिची भेट झाली होती. ती मुळची पाकिस्तानची होती. सलमान चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सोमी आणि त्याची ओळख झाली होती. सलमानच्या अभिनयावर ती प्रचंड फिदा होती. केवळ सलमानसाठी ती बॉलिवूडमध्ये आली होती. सलमानसोबत लग्न करायला मिळावे यासाठी ती फ्लोरिडा येथून भारतात आली होती आणि तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. सलमान आणि सलमानच्या कुटुंबियांसोबत तिची चांगलीच दोस्ती जमली होती. त्याकाळात सलमान आणि संगीता बिजलानी नात्यात होते. पण सोमी अलीच्या सलमान प्रेमात पडल्यामुळे सलमानने संगीतासोबत ब्रेक अप केले होते. सोमी आणि सलमान यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. पण त्याच वेळी ऐश्वर्याच्या मागे सलमान वेडा झाला. सलमान ऐश्वर्यात गुंततो आहे हे सोमीच्या लक्षात आल्यानंतर सोमी सलमानला सोडून निघून गेली.
सोमी आणि सलमान हे दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सोमी आता अमेरिकेत ह्युमन राइट अॅक्टिव्हिस्ट म्हणून काम करते. तसेच तिची एनजीओ देखील आहे. सलमान आजही अनेकवेळा सोमीला भेटतो. आजही माझा सगळ्यात चांगला मित्र सलमानच असल्याचे सोमी तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगते. तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टींबद्दल तिला अजिबात पश्चाताप होत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
सोमी अलीने आंदोलन, कृष्ण अवतार, यार गद्दार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सलमानसोबत ब्रेक अप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूड सोडले. ती १९९७ ला अग्निचक्र या चित्रपटात शेवटची झळकली होती.
![somy ali salman khan]()
Also Read : सलमान खानने या अभिनेत्याला दिला होता चोप