‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून राजकारणात केला प्रवेश; भाजपाच्या तिकिटावर लढविणार निवडणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:00 IST2017-09-14T12:30:52+5:302017-09-14T18:00:52+5:30

गेल्या वेळेस ‘बिग बॉस-९’मध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री रिमी सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, रिमीने याच वर्षाच्या सुरुवातीला ...

The actress has left acting to enter politics; Election to fight against BJP ticket! | ‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून राजकारणात केला प्रवेश; भाजपाच्या तिकिटावर लढविणार निवडणूक!

‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून राजकारणात केला प्रवेश; भाजपाच्या तिकिटावर लढविणार निवडणूक!

ल्या वेळेस ‘बिग बॉस-९’मध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री रिमी सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, रिमीने याच वर्षाच्या सुरुवातीला राजकारणाकडे आपला मोर्चा वळवून भारतीय जनता पक्षात (बीजेपी) प्रवेश केला आहे. अभिनय सोडून थेट राजकारणाच्या पटलावर उतरल्यामुळे रिमीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तिने हा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रेरित होऊन घेतल्याचे समजते. वृत्तानुसार रिमी पक्षात एक सक्रिय नेता म्हणून काम करणार आहे. वास्तविक बॉलिवूड आणि राजकारण याचं काही नवीन नातं नाही. यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनयाला सोडचिठ्ठी देत राजकारणाच्या पटलावर आपला प्रभाव दाखविला आहे. आता रिमी सेन हे नावदेखील जोडले गेले आहे. 



रिपोर्टनुसार रिमी लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने पश्चिम बंगालमधील राजकारणात एक सक्रिय नेता बनण्यासाठी रिमीला विनंती केली होती. तिने या विनंतीचा मान राखत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. 



गेल्या काही काळापासून रिमी चित्रपटांमधून गायब झाली आहे. २०११ मध्ये आलेल्या ‘शागिर्द’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. त्यानंतर जणूकाही ती इंडस्ट्रीमधून गायबच झाली. पुढे ती ‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकली. शोमध्ये ती आपला प्रभाव दाखविण्यात सपशेल अपयशी ठरली. चित्रपट करिअरविषयी बोलायचे झाल्यास रिमीने २००३ मध्ये आलेल्या ‘हंगामा’ या कॉमेडीपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. पुढे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘फिर हेरा फेरी’ (२००६) मध्ये ती झळकली. 



त्याअगोदर तिने धूम (२००४), क्यो की (२००५) गोलमाल (२००६) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. सलमान खान, अजय देवगण, अक्षयकुमार यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केल्यानंतरही तिला इंडस्ट्रीत टिकून राहता आले नाही. २०११ नंतर मात्र ती इंडस्ट्रीतून गायबच झाली. रिमीने २०१६ मध्ये आलेल्या ‘बुधिया सिंह बोर्न टू रन’ या चित्रपटासाठी निर्माता म्हणून काम केले. 

Web Title: The actress has left acting to enter politics; Election to fight against BJP ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.