Bipasha Basu : प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:02 PM2022-11-04T16:02:01+5:302022-11-04T16:04:35+5:30

Bipasha Basu : बिपाशा बासू सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. 43 वर्षांची बिपाशा लग्नाच्या 6 वर्षानंतर आई होणार आहे. साहजिक ती आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर दोघंही जाम खूश्श आहेत.

Actress Bipasha Basu Falunt Her Baby Bump In New Bold Pregnancy Photoshoot | Bipasha Basu : प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

Bipasha Basu : प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

googlenewsNext

Bipasha Basu flaunt Baby Bump in New Pregnancy Photoshoot : बिपाशा बासू ( Bipasha Basu ) सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. 43 वर्षांची बिपाशा लग्नाच्या 6 वर्षानंतर आई होणार आहे. साहजिक ती आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर दोघंही जाम खूश्श आहेत. बिपाशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आनंदाची झलक तुम्हाला पाहायला मिळतेय. आता बिपाशाने नवं प्रेग्नंसी फोटोशूट केलं आहे. याचा एक फोटो तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे आणि त्यामुळे सध्या तिच्या याच प्रेग्नेंसी फोटोशूटची चर्चा आहे. हे फोटोशूट कधी नव्हे इतकं बोल्ड आहे.
गोल्डन कलरच्या शिमरी कपड्यात बिपाशाने बोल्ड फोटोशूट केलं आहे.  या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

अनेकांनी बिपाशाच्या या फोटोचं कौतुक केलं आहे. मात्र अनेकांनी यावरून तिला ट्रोल करण्याची संधीही साधली आहे. ये लोग पगले हो गये..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. असे फोटो टाकणं खरंच गरजेचं आहे का? असा सवाल एका युजरने केला आहे. अर्थात बिपाशाच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड प्रेग्नंसी लुक चांगलाच आवडला आहे. 4 तासांत सुमारे  दीड लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे.

2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषत: तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. 
 

Web Title: Actress Bipasha Basu Falunt Her Baby Bump In New Bold Pregnancy Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.