पाचशे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ‘या’ मल्याळम अभिनेत्याचे दीर्घ आजाराने निधन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 16:30 IST2018-04-05T10:48:08+5:302018-04-05T16:30:50+5:30
नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जात असलेले मल्याळम अभिनेते कोल्लम अजित यांचे गुरुवारी उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले ...
.jpg)
पाचशे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ‘या’ मल्याळम अभिनेत्याचे दीर्घ आजाराने निधन!
न ारात्मक भूमिकांसाठी ओळखले जात असलेले मल्याळम अभिनेते कोल्लम अजित यांचे गुरुवारी उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले की, ५६ वर्षीय अजित यांची गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली. अजित यांच्या निधनामुळे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण इंडस्ट्रीत ते दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
तीन दशकाच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी पाचशे चित्रपटांमध्ये काम करताना मल्याळम इंडस्ट्रीबरोबरच तामीळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक पद्मराजन यांच्या १९८४ मध्ये आलेल्या ‘परनु परनु परनु’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये आपली अदाकारी दाखविली. नकारात्मक भूमिकांसाठी त्यांना संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखले जात होते.
मोहनलाल अभिनित सर्वाधिक यशस्वी चित्रपट असलेल्या ‘इरूपथम नूताण्डु’ (१९८७) या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना मल्याळम इंडस्ट्रीत खलनायकाचा दर्जा मिळाला. कारण या भूमिकेनंतर त्यांना इंडस्ट्रीत केवळ नकारात्मक भूमिका आॅफर केल्या गेल्या. दरम्यान, अजित यांचे पार्थिव कोल्लम येथे नेण्यात येणार असून, त्याठिकाणीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अजित यांच्या निधनामुळे संपूर्ण मल्याळम इंडस्ट्रीला धक्का बसला असून, चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.