सनी लिओनीसोबत काम केलेल्या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:32 PM2024-04-02T17:32:15+5:302024-04-02T17:33:30+5:30

सनी लिओनीसोबत One Night Stand सिनेमात काम केलेल्या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास. नेमकं सत्य काय?

actor tanuj virwani quit acting april fool prank work with sunny leone | सनी लिओनीसोबत काम केलेल्या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास! नेमकं प्रकरण काय?

सनी लिओनीसोबत काम केलेल्या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रातून घेतला संन्यास! नेमकं प्रकरण काय?

अनेक अभिनेते करिअरच्या  शिखरावर असताना अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतात. काही कलाकार वैयक्तिक कारणास्तव अभिनयातून ब्रेक घेतात. तर काही धर्म आणि इतर गोष्टींमुळे अभिनय क्षेत्र सोडतात. नुकतीच मनोरंजन विश्वातुन अशीच एक बातमी समोर येतेय. सनी लिओनीसोबत काम केलेला अभिनेता तनुज विरवानीने अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा केलीय. पण प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. आम्ही सविस्तर सांगतो.

तनुजने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. तनुजने लिहिले की, "गेल्या काही वर्षांत अभिनेता म्हणून माझा अभिनय उत्कृष्ट राहिला आहे. परंतु प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो. मी अभिनयातून निवृत्त होत आहे आणि माझ्या इतर आवडींचं पालन करेन. तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.'' अभिनेत्याची ही पोस्ट वाचताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्याने अचानक असा निर्णय का घेतला हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

जर तुम्ही देखील विचार करत असाल की तनुजने अभिनयातून निवृत्ती घेतली. तर असं नाही. तनुजने स्वतः त्याच्या कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, 'एप्रिल फूल प्रँक.' याचा अर्थ त्याने असं बोलून लोकांना फसवलं आहे. अभिनय सोडण्याचा तनुजचा कोणताही विचार नाही. एप्रिल फूल निमित्ताने तनुजने सर्वांना वेड्यात काढलं असून सर्वांनी त्याच्या पोस्टवर हसण्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: actor tanuj virwani quit acting april fool prank work with sunny leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.