मॅन विद अ प्लॅन..!   किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने केली चार्टर फ्लाईटची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:52 AM2020-07-22T10:52:17+5:302020-07-22T10:53:20+5:30

किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे.

actor sonu sood bringing back students from kyrgyzstans |  मॅन विद अ प्लॅन..!   किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने केली चार्टर फ्लाईटची व्यवस्था

 मॅन विद अ प्लॅन..!   किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने केली चार्टर फ्लाईटची व्यवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सोनूने हजारो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले होते.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरीत मजुरांना मदतीचा हात देणारा, त्यांना आपआपल्या घरी सुखरूप पोहोचवणारा अभिनेता सोनू सूद आता विदेशात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. होय, किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पहिले विमान रवाना होणार आहे.
सोनूने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली. किर्गिस्तान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी आणण्याची वेळ आलीय. 22 जुलैला पहिले चार्टर फ्लाईट  यासाठी रवाना होईल. याच आठवड्यात काही आणखी देशांतही चार्टर फ्लाईट पाठवले जाईल, असे ट्विट सोनूने केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बिहार-झारखंड येथील आहे.  

  पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सोनूने हजारो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था त्याने केली होती. त्याने दिवसरात्र स्वत:ला या कामात झोकून दिले होते. अद्यापही तो अनेकांची मदत करतो. अलीकडे एका बेघर महिलेच्या मदतीसाठी सोनू धावून आला. एक बेघर महिला आपल्या दोन मुलांना घेऊन फुटपाथवर झोपलेली असतानाचा फोटो एका युजरने ट्वीटरवर शेअर करत त्यात सोनूकडे मदत मागितली होती. सोनूने देखील विलंब न करता तातडीने  त्या ट्वीटला रिप्लाय दिला होता. उद्या रात्रीपर्यंत या मुलांच्या डोक्यावर छत असेल असा रिप्लाय त्याने दिला होता. सोनूचा रिप्लाय पाहून अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. रिअल हिरो कसा असतो याची प्रचिती पुन्हा सा-यांना आली होती.

Web Title: actor sonu sood bringing back students from kyrgyzstans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.