‘ही’ अभिनेत्री म्हणते, रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका करायला मिळाली तरी बेहतर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:03 IST2017-09-14T15:33:44+5:302017-09-14T21:03:44+5:30

छोट्या पडद्यावरून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री समीक्षा भटनागर हिचा नुकताच ‘पोस्टर बॉयज’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स ...

Actor says, better than Ranbir Kapoor's role to play! | ‘ही’ अभिनेत्री म्हणते, रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका करायला मिळाली तरी बेहतर!

‘ही’ अभिनेत्री म्हणते, रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका करायला मिळाली तरी बेहतर!

ट्या पडद्यावरून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री समीक्षा भटनागर हिचा नुकताच ‘पोस्टर बॉयज’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव टाकला नसला तरी, चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. या चित्रपटानिमित्त तिच्याशी चर्चा केली असता तिने इंडस्ट्रीमध्ये तिच्या फेव्हरेट स्टार्सविषयी मनसोक्तपणे गप्पा मारल्या. समीक्षाने म्हटले की, मी अभिनेता रणबीर कपूरची प्रचंड चाहती आहे. चित्रपटात त्याची अभिनेत्री म्हणून नव्हे तर बहीण म्हणून जरी भूमिका मिळाली तरी ती एका पायावर साकारायला तयार असल्याचे तिने सांगितले. 

समीक्षाने याविषयी बोलताना देओल बंधूंचे कौतुक केले. ती म्हणाली की, देओल ब्रदर्सविषयी जसे ऐकले होते अगदी तसेच ते दोघे आहेत. सनीसोबत माझे फारसे सीन नव्हते त्यामुळे त्यांना खूप जवळून समजून घेण्याची संधी मिळाली नाही. परंतु बॉबीसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. बॉबी सुरुवातीला त्याच्या को-स्टारशी मैत्री करतो. जेणेकरून त्यांच्यातील केमिस्ट्री चांगली जमायला हवी. मनापासून सांगायचे झाल्यास, बॉबीसोबत काम करून खूपच चांगले वाटले असून, पुन्हा त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असून, त्यासाठी मला सगळ्यांचेच सहकार्य मिळाले आहे. 



यावेळी समीक्षाने बॉबीची पिटाई केल्याच्या चर्चेवरही खुलासा केला. समीक्षाने म्हटले की, हे खरं आहे की, मी चुकून बॉबीची पिटाई केली होती. वास्तविक चित्रपटात एका सीनमध्ये मला बॉबीवर रागवायचे होते. मात्र हा सीन करताना मी त्यामध्ये एवढी गुंतली की, मी खरोखरच रागाच्या भरात बॉबीची पिटाई केली. या दरम्यान, बॉबीच्या हाताला छोटीशी जखमही झाली होती. मात्र सीन पूर्ण होताच मी लगेचच बॉबीची माफी मागितली. तेव्हा बॉबी म्हणाला की, हे तर काहीच नाही आम्ही कित्येकदा लोकांना जखमी केले आहे. 

असो, समीक्षाच्या फेव्हरेट स्टार्सविषयी सांगायचे झाल्यास, त्याचे नाव रणबीर कपूर आहे. होय, समीक्षा रणबीरची जबरदस्त चाहती असून, त्याची हिरोईन बनायला मिळाल्यास करिअर सार्थकी लागेल, असे ती म्हणते. जर त्याची हिरोईन बनता आले नाही तर किमान त्याच्या बहिणीची तरी भूमिका द्यावी, असेही समीक्षा म्हणाली. रणबीरप्रती समीक्षाचे प्रेम खरोखरच वाखण्याजोगे म्हणावे लागेल. 

Web Title: Actor says, better than Ranbir Kapoor's role to play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.