आर.माधवनच्या मुलाची कामगीरी पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 04:38 PM2020-11-09T16:38:21+5:302020-11-09T16:38:41+5:30

आर. माधवनने ‘रंग दे बसंती’,‘थ्री इडियट्स’,‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ अशा चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटानं त्याला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख दिली.

Actor R. Madhavan Son Vedaant Won Silver Medal At International Swimming Championship | आर.माधवनच्या मुलाची कामगीरी पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

आर.माधवनच्या मुलाची कामगीरी पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

googlenewsNext

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक स्टार किड्सने बॉलिवूड सिनेमात पदार्पण करत आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. आपल्या आई- वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेकजण आज स्टारडम आणि सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र असाही एक सेलिब्रेटी आहे ज्याचा मुलगा अभिनय क्षेत्रात नाहीतर एका वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. 

आर.माधवनचे अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टी करण्यातही रूची ठेवतो.  त्याचे गोल्फ प्रेम लपलेले नाही. वेळ मिळल्यास तो हा खेळ खेळताना दिसतो. माधवनप्रमाणे त्याचा मुलगा वेदांत माधवन देखील क्रीडाप्रेमी आहे. वेदांतनं थायलँडमध्ये पार पडलेल्या स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. वेदांन कधीच मीडियासमोर आला नाही. आर. माधवनचे कुटुंब हे प्रसिद्धीपासून लांबच राहणे पसंत करतात. अवघ्या १४ वर्षाचा वेदांतला स्विमिंगमध्ये विशेष आवड त्यामुळे आर. माधवनही त्याला पूर्णपणे पाठिंबा देतो.

एशियन एज ग्रुप स्विमिंग चैम्पियनशिपमध्ये तो सहभागी झाला होता. वेदांतने सिल्वर मेडलही मिळवले  होते. आर. माधवनने इंस्टाग्रामवर आपल्या लाडक्या मुलाविषयी  एक पोस्ट भावूक शेअर केली होती. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतलो होते. त्याच्या चाहत्यांनी वेदांतचे भरभरून कौतुकही केले होते.

एकीकडे अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांना अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठवतात तर आर. माधवन या सगळ्यांपलिकडेही आपल्या मुलाला एक चांगला खेळाडू बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे नक्कीच आर. माधवन या सगळ्यांमध्ये काहीसा वेगळा ठरतो. आर. माधवनने ‘रंग दे बसंती’,‘थ्री इडियट्स’,‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ अशा चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटानं त्याला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख दिली. या चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. तेव्हापासून माधवनचीही एक वेगळीच क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

'बाबा का ढाबा' मालकाच्या फसवणुकीवर आर. माधवनची संतप्त प्रतिक्रीया म्हणाला.........

नुकताच बाबा का ढाबाचे मालक कांता दास यांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून देणारा युट्युबर गौरव वासन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही बातमी आल्यानंतर याचीही तुफान चर्चा होत आहे. यावर अभिनेता आर.माधवननेही ट्विट करत आपले मत मांडले आहे. अशा गोष्टी लोकांना चांगले काम करण्यास रोखतात. त्यामुळे लवकरात लवकरच या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करावी. सत्य समोर आल्यानंतर गुन्हेगाराला योग्य शिक्षाही द्यावी. दिल्ली पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे.

Web Title: Actor R. Madhavan Son Vedaant Won Silver Medal At International Swimming Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.