किरण रावनंतर आणखी एका सुपरस्टारच्या पत्नीने Animal ला ठेवली नावं, म्हणाली, '९०० कोटी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:41 PM2024-02-05T17:41:57+5:302024-02-05T17:42:43+5:30

बॉक्सऑफिसवर भलेही सिनेमा सुपरहिट झाला असला तरी सिनेमाविरोधात बोलणारेही अनेक लोक आहेत.

actor Irfan Khan s wife Sutapa Sikander took dig on Animal movie says its overrated | किरण रावनंतर आणखी एका सुपरस्टारच्या पत्नीने Animal ला ठेवली नावं, म्हणाली, '९०० कोटी...'

किरण रावनंतर आणखी एका सुपरस्टारच्या पत्नीने Animal ला ठेवली नावं, म्हणाली, '९०० कोटी...'

साऊथ दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या Animal चा वाद संपता संपत नाही. फिल्म इंडस्ट्रीतील लोकच सिनेमावर निगेटिव्ह प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी आमिर खानची पत्नी किरण रावनेसिनेमाला नावं ठेवल्यानंतर संदीप रेड्डी वांगा चांगलेच लालबुंद झाले होते. आता सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका सुपरस्टारच्या पत्नीने Animal वर निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. बॉक्सऑफिसवर भलेही सिनेमा सुपरहिट झाला असला तरी सिनेमाविरोधात बोलणारेही अनेक लोक आहेत.

भारतीय सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेता इरफान यांची पत्नी सुतापा सिकंदर (Sutapa Sikander)आणि मुलगा बाबिल खानने Idiva ला मुलाखत दिली. यावेळी दोघांना लेटेस्ट ओव्हररेटेड शो किंवा सिनेमा कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बाबिलने उत्तर देणं टाळलं. मात्र सुतापा सिकंदर या Animal चं नाव घेण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. सुतापा यांनी लगेचच '900 कोटी कमावणारी फिल्म अॅनिमल' असं उत्तर दिलं. 

काही दिवसांपूर्वीच किरण रावने संदीप रेड्डी वांगा यांचे चित्रपट हे महिला विरोधी असतात असं वक्तव्य केलं होतं. यानंतर वांगा यांनी आमिर खानच्या सिनेमांचं उदाहरण देत त्यांचा रोखठोक उत्तर दिलं होतं. संदीप रेड्डी वांगा यांना सध्या बऱ्याच रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र ते प्रत्येकाला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. 

इतके कोटी कमावणाऱ्या Animal या सिनेमाचा सीक्वेलही येणार आहे. Animal Park नावाने हा सिनेमा येणार आहे. पहिल्या भागापेक्षा हा सिनेमा आणखी जास्त भयानक असणार असं दिग्दर्शकाने आधीच स्पष्ट केलं आहे.

Web Title: actor Irfan Khan s wife Sutapa Sikander took dig on Animal movie says its overrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.