सूरज बडजात्या यांच्या सिनेमात सलमान खानऐवजी हा अभिनेता बनणार प्रेम, दिग्दर्शक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:09 IST2025-08-12T12:08:57+5:302025-08-12T12:09:40+5:30

Salman Khan And Suraj Barjatya : सूरज बडजात्या लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सलमान खान नाही तर दुसरा कोणीतरी अभिनेता या चित्रपटात प्रेमची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.

actor Ayushmann Khurrana will play Prem instead of Salman Khan in Suraj Barjatya's film, the director said... | सूरज बडजात्या यांच्या सिनेमात सलमान खानऐवजी हा अभिनेता बनणार प्रेम, दिग्दर्शक म्हणाले...

सूरज बडजात्या यांच्या सिनेमात सलमान खानऐवजी हा अभिनेता बनणार प्रेम, दिग्दर्शक म्हणाले...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)ने दिग्दर्शक सूरज बडजात्या (Suraj Barjatya) यांच्या अनेक चित्रपटांमध्ये 'प्रेम' ही भूमिका साकारली होती आणि लोकांची मने जिंकली होती. आता असे वृत्त समोर येत आहे की, सलमानची ही प्रतिष्ठित भूमिका दुसऱ्या कोणत्या तरी अभिनेत्याला दिली जाणार आहे. आता सूरज बडजात्या यांनी स्वतः या वृत्तांवर आपले मौन सोडले आहे. 

खरंतर गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की, सलमान खानऐवजी अभिनेता आयुषमान खुराणा सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात 'प्रेम'ची भूमिका साकारणार आहे. आता, पीटीआयशी बोलताना, दिग्दर्शकाने या बातम्यांवरील मौन सोडले. त्यांनी सांगितले की, "आम्ही आयुषमान आणि शर्वरीसोबत मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहोत, चित्रपटाची कथा देखील मुंबईवर आधारित आहे. आयुषमान एक चांगला अभिनेता आहे. या दोघांव्यतिरिक्त, चित्रपटात इतर अनेक उत्तम कलाकार असणार आहेत."

मी खूप घाबरलो आहे - सूरज बडजात्या
दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, प्रत्येकवेळी प्रमाणे मी या चित्रपटासाठी देखील घाबरलो आहे. 'मैने प्यार किया' पासून ही कथा माझ्यासोबत सुरू आहे. कारण माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की लोक त्या कल्पनेशी किंवा दृश्याशी जोडले जाऊ शकतात की नाही"  यावेळी सूरज बडजात्या यांनी असेही सांगितले की चित्रपटातील आयुषमानच्या व्यक्तिरेखेचे नाव 'प्रेम' असणार आहे.

सलमानने या चित्रपटांमध्ये साकारलीय 'प्रेम'ची भूमिका
सलमान खानने मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है आणि प्रेम रतन धन पायोसारख्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेमची भूमिका केली आहे. आयुषमानबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या 'थामा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे.

Web Title: actor Ayushmann Khurrana will play Prem instead of Salman Khan in Suraj Barjatya's film, the director said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.