अभिनेता अमोल पराशर दिसणार 'ह्या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:52 IST2018-10-31T15:41:54+5:302018-10-31T15:52:01+5:30

अभिनेता अमोल पराशर 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात दिसणार आहे.

Actor Amol Parashar will appear in 'This' movie | अभिनेता अमोल पराशर दिसणार 'ह्या' सिनेमात

अभिनेता अमोल पराशर दिसणार 'ह्या' सिनेमात

ठळक मुद्दे 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' चित्रपटात अमोल पराशर मुख्य भूमिकेतअमोल पहिल्यांदाच दिसणार कोंकणा सेनसोबत

अभिनेता अमोल पराशरने 'ट्रिपलिंग' व 'होम' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे आणि आता त्याने 'ट्रिपलिंग' या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे. आता तो एका नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे. अमोल पराशर 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती एकता कपूर करत असून दिग्दर्शन अलंक्रिता श्रीवास्तव करणार आहे. या सिनेमात अमोलसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर व कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोलने डिजिटल माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याने विविध भूमिका सक्षमपणे साकारली आहे. आता तो डॉली किट्टी और वो चमकते सितारे सिनेमात अमोल कोंकणा सेनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अमोल खूप उत्सुक असून त्याने या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात देखील केली आहे.
या चित्रपटाबाबत अमोल पराशर म्हणाला की, ''डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटातील माझे काही सीन्स मी चित्रीत केले आहेत. अलंक्रितासोबत काम करायला खूप मजा येते. माझे जास्त सीन कोंकणा सेनसोबत असून मी त्याबाबत खूप उत्सुक आहे. ती उत्तम अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करताना खूप आनंद मिळतो.'
अमोल पराशरने 'ट्राफिक' या सिनेमात काम केले असून आता त्याला डॉली किट्टी और वो चमकते सितारे या सिनेमात पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Actor Amol Parashar will appear in 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.