२८ एप्रिलला आमिर खान चाहत्यांना देणारेय सरप्राइज, व्हिडिओ शेअर करत म्हणाला- 'मी सांगणारेय एक गोष्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:38 PM2022-04-22T19:38:21+5:302022-04-22T19:38:44+5:30

आमिर खान (Aamir Khan) बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तो लवकरच 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे.

Actor Aamir Khan Played Cricket On Rooftop Said He Will Tell A Story To People On 28 April | २८ एप्रिलला आमिर खान चाहत्यांना देणारेय सरप्राइज, व्हिडिओ शेअर करत म्हणाला- 'मी सांगणारेय एक गोष्ट'

२८ एप्रिलला आमिर खान चाहत्यांना देणारेय सरप्राइज, व्हिडिओ शेअर करत म्हणाला- 'मी सांगणारेय एक गोष्ट'

googlenewsNext

आमिर खान (Aamir Khan) बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तो लवकरच 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha Movie) या चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. आमिरने त्याच्या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहते त्याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यानंतर चाहत्यांमध्ये लाल सिंग चड्ढा सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेता आमिर खान चित्रपटाच्या टीमसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. फलंदाजी करताना, आमिर शॉट घेताना म्हणतो, 'मी तुम्हाला २८ तारखेला एक गोष्ट सांगणार आहे'. आमिर खानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. २८ एप्रिल रोजी लाल सिंग चड्ढाच्या टीझर किंवा ट्रेलर रिलीज होईल, असा अंदाज बहुतेक लोक लावत आहेत.


लाल सिंग चड्ढा बद्दल बोलायचे तर हा टॉम हँक्स स्टारर फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट १२ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. यापूर्वी आमिर २०१८ मध्ये आलेल्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नव्हता.

Web Title: Actor Aamir Khan Played Cricket On Rooftop Said He Will Tell A Story To People On 28 April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.