​अभिनय कधीचाच सोडला, आता रिमी सेन करतेय ‘हे’ काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:54 IST2018-04-09T10:24:03+5:302018-04-09T15:54:03+5:30

‘हंगामा’,‘बागबान’,‘दीवाने हुए पागल’,‘गोलमान अलिमिटेड’ असे असे अनेक चित्रपट करणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या कुठेय? तर अ‍ॅक्टिंग सोडून वेगळ्याच कामात ...

Acting never left, now Rimi Sen is doing 'Hey' work !! | ​अभिनय कधीचाच सोडला, आता रिमी सेन करतेय ‘हे’ काम!!

​अभिनय कधीचाच सोडला, आता रिमी सेन करतेय ‘हे’ काम!!

ंगामा’,‘बागबान’,‘दीवाने हुए पागल’,‘गोलमान अलिमिटेड’ असे असे अनेक चित्रपट करणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या कुठेय? तर अ‍ॅक्टिंग सोडून वेगळ्याच कामात बिझी आहे. होय, रिमीने अभिनय सोडला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत रिमी कुठेच दिसली नाही. पण आता रिमी पुन्हा सक्रिय होऊ इच्छितेय. अर्थात अभिनय क्षेत्रात नाही तर दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात. होय, रिमी सेन आताश: दिग्दर्शन आणि निर्मितीच्या कामात बिझी आहे.
अलीकडे मुंबईतील एका इ्व्हेंटमध्ये रिमीने हजेरी लावली. यावेळी तिने स्वत: ही माहिती दिली. आता मी अभिनय करणार नाही. कारण अभिनय मी कधीचाच सोडला आहे. त्याकाळात मला काम मिळत होते, म्हणून मी काम करत होते. पण एकक्षण असा आला की, माझे काम मला कंटाळवाणे वाटू लागले. कॉमेडी चित्रपट करून करून मी थकून गेले. इतके की नंतर मी अभिनय कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला. आता मी दिग्दर्शक आणि निर्मितीवर माझे लक्ष केंद्रीत केले आहे. सगळे काही जमून आले आणि चांगली स्क्रिप्ट मिळाली तर लवकरच माझे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस नवा चित्रपट हाती घेईल. यापूर्वी आम्ही ‘बुधिया सिंह- बॉर्न टू रन’ नामक चित्रपट प्रोड्यूस केला होता. यात मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत होता. (सत्यकथेवर आधारित या चित्रपटाला २०१५ चा सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. ) माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी माझी काही वेगळी योजना आहे. माझा पुढचा प्रोजेक्ट पूर्णपणे कमर्शिअल प्रोजेक्ट असेल, असे तिने सांगितले.
२०१५ मध्ये रिमी सेन बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये दिसली होती. पण या घरात ना रिमीने कुठला टास्क केला , ना अ‍ॅक्टिव्ह राहिली. गतवर्षी तिने राजकारणातही हात आजमावला. भाजपात ती सामील झाली. पण आता रिमीने दिग्दर्शन आणि निर्मितीत रस घेणे सुरु केले आहे. अशास्थितीत आपण केवळ रिमीला शुभेच्छा देऊ शकतो.

Web Title: Acting never left, now Rimi Sen is doing 'Hey' work !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.