दोन पिढय़ांचा अभिनय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:35 IST2016-01-16T01:06:47+5:302016-02-10T08:35:14+5:30

'घायल रिटर्न'च्या प्रमोशनात व्यस्त सनी देओलने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, जेव्हा माझे वडील धर्मेंद्र यांनी हृषिकेश मुखर्जींच्या ...

The acting journey of two generations | दोन पिढय़ांचा अभिनय प्रवास

दोन पिढय़ांचा अभिनय प्रवास

'
;घायल रिटर्न'च्या प्रमोशनात व्यस्त सनी देओलने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, जेव्हा माझे वडील धर्मेंद्र यांनी हृषिकेश मुखर्जींच्या 'चुपके चुपके' चित्रपटात काम केले होते. 'चुपके चुपके' ची आठवण आली, कारण 'घायल रिटर्न' मध्ये शर्मिला टागोरची मुलगी सोहा अली खानने देखील काम केले आहे. शूटींगच्या वेळी सोहा सोबत 'चुपके चुपके' आणि त्यांचे आई-वडिलांच्या दुसर्‍या चित्रपटांविषयी भरपूर गप्पा होत होत्या.
सनीचे हे म्हणणे खरे आहे. गतकाळातील नायक-नायिकांच्या मुलांची जोडी या काळातील चित्रपटात काम करताना दिसतात.
यासाखळीत धर्मेंद्रचा लहान मुलगा बॉबी देओलचेही नाव जूडते, ज्याने पहिला चित्रपट 'बरसात'मध्ये ट्विंकल खन्नासोबत काम केले होते. या दोघांचा हा लॉँचिंग चित्रपट होता. धमेंद्रने टिं्वकलची आई डिंपल सोबत जेपी दत्ताच्या 'बंटवारा'सह अनेक चित्रपटात काम केले. यात विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नादेखील आहे. अक्षयचे वडील विनोद खन्ना आणि बबीता कपूरच्या बाबतीत सांगायचे तर, १९७२ च्या 'एक हसीना दो दीवाने' या चित्रपटात त्यांची जोडी होती. 'दीवाना तेरे नाम का' मध्ये अक्षयची जोडी करिश्मा कपूर सोबत होती, तर प्रियदर्शनच्या 'हलचल'मध्ये अक्षय आणि करिना कपूर जोडीदार होते. करिना कपूरने तुषार कपूरचा लाँचिंग चित्रपट 'मुझे कुछ कहना है' मध्ये नायिका म्हणून काम केले, तर करिनाची आई बबीता आणि तुषारचे वडील जीतेंद्र यांच्या जोडीने 'फर्ज'सह अध्र्या डझन चित्रपटात सोबत काम केले होते.
१९७३ मध्ये मनमोहन देसाईचा चित्रपट 'आ गले लग जा'मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि शर्मिला टागोरने काम के ले होते. शैतान (१९७४), दो शत्रु (१९८0) मध्ये देखील ते सोबत होते. शॉटगन शत्रुची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि शर्मिला पुत्र सैफ अलीची जोडी तिग्मांशू धूलियाचा 'बुलेट राजा' चित्रपटात दिसली, मात्र दर्शकांना प्रभावित करण्यात ते अयशस्वी राहिले. या यादीत अमिताभ बच्चनदेखील आहेत. बिग बी आणि हेमा मालिनीच्या चित्रपटांची यादी मोठी आहे. 'नास्तिक' आणि 'सत्ते पे सत्ता' सह दोघांनी बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. अनुभव सिन्हाचा चित्रपट 'दस'मध्ये या दोघांच्या मुलांनी सोबत काम केले. जूनियर बच्चन आणि ईशा देओलच्या जोडीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट ठरला. ईशा देओल सोबत मेघना गुलजारचा चित्रपट 'जस्ट मैरिज' बॉक्स ऑफिसवर काही विशेष करु शकला नाही, मात्र या यादीत समावेश झालेत. या चित्रपटात ईशाचा नायक फरदीन खान होता. फरदीनचे वडील फिरोज खान आणि हेमा मालिनीचा 'धर्मात्मा' सुपर हिट ठरला होता.

Web Title: The acting journey of two generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.