The Accidental Prime Minister! हुबेहुब ‘मनमोहन सिंग’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:45 IST2018-04-05T09:15:39+5:302018-04-05T14:45:39+5:30
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे लूक आज समोर आले. या ...
.jpg)
The Accidental Prime Minister! हुबेहुब ‘मनमोहन सिंग’!!
द शाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे लूक आज समोर आले. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. फर्स्ट लूकमध्ये त्यांचा अंदाज हुबेहुब मनमोहनसिंग यांच्यासारखा आहे. पांढरा कुर्ता पायजामा, नेहरू जॅकेट , डोक्यावर पगडी आणि पांढरी दाढी अशा अंदाजात ते दिसताहेत. मनमोहनसिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग आॅफ मनमोहन सिंह’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रकाशित झालेल्या या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. आता याच पुस्तकावर आधारित चित्रपट येतोय. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाकडे साहजिकचं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
![]()
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. तर विजय रत्नाकर गुट्टे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना हाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. संजय बारूचे पात्र तो रंगवणार आहे. आहना कुमरा ही अभिनेत्री प्रियांका गांधीच्या तर अर्जुन माथुर राहुल गांधी यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ या चित्रपटाने आहाना चर्चेत आली होती.
अनुपम खेर यांची विचारधारा जगजाहिर आहे. त्यामुळे ते मनमोहनसिंग यांची भूमिका कशी साकारतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. यासंदर्भात बोलताना अनुपम यांनी ही भूमिका अतिशय आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ही भूमिका माझ्यासाठी आव्हान होते. मनमोहनसिंग २४ तास मीडियात दिसायचे. त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी अनेक महिने कष्ट घेतले. माझे प्रयत्न सिनेमॅटिक रिअॅलिटीमध्ये बदलावेत, अशी माझी इच्छा आहे,असेही ते म्हणाले.
ALSO READ : कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही अनुपम खेर व किरण खेर यांची लव्हस्टोरी!