धक्कादायक! साखरपुड्याच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:37 PM2024-04-11T17:37:34+5:302024-04-11T17:37:53+5:30

एका प्रसिद्ध अभिनेत्याचा साखरपुड्याच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे (suraj meher)

Accidental death of a famous actor suraj meher on the day of engagement on chattisgarh | धक्कादायक! साखरपुड्याच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

धक्कादायक! साखरपुड्याच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

 मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध अभिनेते सूरज मेहर यांचं निधन झालं आहे. सूरज हे नारद मेहर या नावाने प्रसिद्ध होते. सूरज हे त्यांच्या 'आखरी फैसला' या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. बुधवारी या चित्रपटाचे शूटिंग आटोपून परतत असताना त्यांचा अपघात झाला. दुर्दैव म्हणजे ज्या दिवशी सूरज यांचा साखरपुडा होणार होता त्याच दिवशी त्यांना अपघातात जीव गमवावा लागला.

शूटिंगवरून परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओची पिकअप ट्रकला जोरदार धडक बसली. सरसिवा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरदुला गावाजवळ ही घटना घडली. ही घटना १० एप्रिलच्या रात्री उशिरा घडल्याचं सांगितले जात आहे. सूरज हे सरिया बिलाईगढ गावचे रहिवासी होते. हा अपघात इतका भीषण होता की कारचं प्रचंड नुकसान झालं. आणि सूरज जागीच मृत झाले.

या घटनेत चालकासह अन्य दोन जण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. दुःखद गोष्ट म्हणजे १० एप्रिललाच सूरज यांचा साखरपुडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सूरज मेहर यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. छत्तीसगडमध्ये निर्मिती झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. सूरज यांच्या दुर्दैवी निधनाने शोककळा पसरली आहे.

Web Title: Accidental death of a famous actor suraj meher on the day of engagement on chattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.