​अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 22:08 IST2016-09-17T11:18:48+5:302016-09-17T22:08:06+5:30

ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याच्या नावाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. १२ तासांत सर्वाधिक वेळा ...

Abhishek Bachchan's name is Guinness Booker! | ​अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकात!

​अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकात!

युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याच्या नावाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून अभिषेकचे नाव गिनीज  बुकात नोंदवण्यात आले आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याला  मात देत, अभिषेकने हा विक्रम आपल्या नावे केला. सन २००४ मध्ये विल स्मिथ त्याच्या ‘ ५‘आय, रोबोट’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोन तासांत तीनदा जनतेसमोर आला होता. अभिषेकने त्याच्या ‘दिल्ली6’या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्मिथचा विक्रम तोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. सन २००९ मध्ये आलेल्या ‘दिल्ली6’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक १२ तासांत सलग सात शहरांमध्ये फिरला व लोकांमध्ये जात त्याने या चित्रपटाचे प्रमोशन केले. यात गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद, दिल्ली, गुडगाव, चंदीगड व मुंबई या सात शहरांचा समावेश आहे. यासाठी अभिषेकने त्याचे प्रायव्हेट जेट आणि कार याद्वारे सुमारे १८०० किमी लांबीचा प्रवास केला होता. आता एवढी मोठा उपलब्धी म्हटल्यावर अभिषेकचे अभिनंदन करायलाच हवे ना!

Web Title: Abhishek Bachchan's name is Guinness Booker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.