"बॉलिवूडमध्ये कोणीही देशभक्त नाही", अभिजीत भट्टाचार्य स्पष्टच बोलले; बिग बी आणि जया बच्चन यांच्यावरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:06 AM2024-04-03T10:06:46+5:302024-04-03T10:07:08+5:30

अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. 

abhijeet bhattacharya taked a dig on bollywood patirotic said people being paid to showcase nationalist | "बॉलिवूडमध्ये कोणीही देशभक्त नाही", अभिजीत भट्टाचार्य स्पष्टच बोलले; बिग बी आणि जया बच्चन यांच्यावरही साधला निशाणा

"बॉलिवूडमध्ये कोणीही देशभक्त नाही", अभिजीत भट्टाचार्य स्पष्टच बोलले; बिग बी आणि जया बच्चन यांच्यावरही साधला निशाणा

अभिजीत भट्टाचार्य हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहेत. अनेक सुपरहिट गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या गाण्यांनी ९०चं दशक गाजवलं. आवाजाबरोबरच ते त्यांच्या स्वभावासाठीही ओळखले जातात. अभिजीत भट्टाचार्य अनेकदा त्याचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. 

अभिजीत भट्टाचार्य यांनी नुकतीच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. "देशभक्तीचं नाटक करा, पण खरे देशभक्त बनू नका. लोकांना देशभक्ती दाखवण्यासाठी पैसे दिले जातात. बॉलिवूडमध्ये केवळ मी एकच देशभक्त आहे. आणि याची मला मोठी किंमत मोजावी लागली आहे. बॉलिवूडमध्ये एकही देशभक्त नाही. देशभक्ती दाखवण्यासाठी बॉलिवूडमध्ये लोकांना पैसे दिले जातात," असं अभिजीत भट्टाचार्य म्हणाले.  त्यांनी नाव न घेता बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावरही निशाणा साधला. "पती एक काहीतरी बोलतो. आणि त्याची बायको संसदेत जाऊन वेगळंच काहीतरी बोलते. एकीकडे नवरा रामलल्लाचं दर्शन करायला जातोय. तर दुसरीकडे पत्नी राम मंदिर विरोधात बोलत आहे. त्यामुळे पैसे देऊन देशभक्ती करून घेऊ नका. मी देशभक्तीसाठी पैसे गमावले आहेत. खूप काही गमावलं आहे. पण, आता मी फक्त गाणं गाऊन लोकांचं मनोरंजन करणार आहे," असंही ते पुढे म्हणाले. 

सलमान खानवर केलेल्या टीकेमुळेही अभिजीत भट्टाचार्य चर्चेत आले होते. सलमान खान पाकिस्तानी गायकांना संधी देतो, असं ते म्हणाले होते. तर शाहरुख खानबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं होतं. शाहरुख खान व्यावसायिक आहे आणि काम असल्याशिवाय तो लोकांशी संपर्क करत नाही. मला माझ्या प्रामाणिकपणामुळे कधीच काम मिळत नाही, असं म्हणाले होते.  

Web Title: abhijeet bhattacharya taked a dig on bollywood patirotic said people being paid to showcase nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.