अर्पिता खानसह पती आयुष शर्माने शेअर केला बोल्ड, सलमानच्या Reaction ने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 04:01 PM2021-03-27T16:01:19+5:302021-03-27T16:02:06+5:30

Aayush Sharma shares romantic photos with wife Arpita Khan: लग्नानंतर या दोघांचे नाते अजुनच घट्ट झाले. या कपलला दोन मुंल आहेत. मुलाचे नाव आहिल आणि मुलीचे नाव आयत आहे.  सलमान नेहमीच मुंलासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. 

Aayush Sharma's shared bold pic with Arpita khan even surprised Salman khan | अर्पिता खानसह पती आयुष शर्माने शेअर केला बोल्ड, सलमानच्या Reaction ने वेधले लक्ष

अर्पिता खानसह पती आयुष शर्माने शेअर केला बोल्ड, सलमानच्या Reaction ने वेधले लक्ष

googlenewsNext

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. लवकरच तो सलमान खानसह 'अंतिम' सिनेमात तो दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुशने त्याच्या लूकवरही प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळेच आज त्याने सलमानप्रमाणेच पिळदार बॉडी मिळवली आहे.

आयुषच्या डॅशिंग लुकचीही चाहते कौतुक करत आहेत. त्याचदरम्यान आयुषने पत्नी अर्पितासह एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. सध्या याच फोटोने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोमँटीक अंदाजातला हा फोटो असून चाहत्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील यावर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये सलमानच्या कमेंट्ने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयुषने शेअर केलेल्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. 


हा फोटो पाहून प्रत्येकजण दोघांच्या जोडी परफेक्ट असल्याचे सांगत कौतुकही करत आहे. दोघेही एकत्र खूप चांगले दिसत आहेत. आयुष अर्पिता दोघे एकमेकांची खूप काळजी घेतात. लग्नानंतर या दोघांचे नाते अजुनच घट्ट झाले. या कपलला दोन मुंल आहेत. मुलाचे नाव आहिल आणि मुलीचे नाव आयत आहे.  सलमान नेहमीच मुंलासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. 

आयुष शर्मा. ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि आयुषच्या करिअरला ब्रेक लागला. पहिलाच सिनेमा आपटला म्हटल्यावर अन्य निर्माते दिग्दर्शकांनीही आयुषमध्ये फार इंटरेस्ट दाखवला नाही. पण म्हणून सलमान थोडीच आयुषला वा-यावर सोडणार? शेवटी आयुष ठरला सलमानच्या लाडक्या बहिणीचा पती.

 

मग काय, सलमान पुन्हा कामाला लागला आणि त्याने आयुषसाठी नवा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. होय, आता सलमान लवकरच आयुषसाठी नवा चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे,हा चित्रपट एका मराठी सिनेमाचा रिमेक असणार आहे.


सलमान खान लवकरच 2018 मध्ये आलेल्या प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या हिंदी रिमेकमध्ये आयुष मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमानही यात सपोर्टिंग रोलमध्ये आहे. यात तो पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसेल. म्हणजे, सलमान असला तरी चित्रपटाची कथा आयुषभोवती फिरताना दिसेल. या चित्रपटासाठी आयुष गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा शिकत असल्याचेही कळतेय.

Web Title: Aayush Sharma's shared bold pic with Arpita khan even surprised Salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.