​आमिरची मुलीशी स्पेशल बाँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:47 IST2016-06-22T10:17:55+5:302016-06-22T15:47:55+5:30

पिता आणि मुलीचं नातं फार स्पेशल असतं. आमिर खान आणि त्याची मुलगी इरा हेदेखील त्याला अपवाद नाहित. आपल्या वडिलांबद्दल ...

Aamir's special bonding with the girl | ​आमिरची मुलीशी स्पेशल बाँडिंग

​आमिरची मुलीशी स्पेशल बाँडिंग

ता आणि मुलीचं नातं फार स्पेशल असतं. आमिर खान आणि त्याची मुलगी इरा हेदेखील त्याला अपवाद नाहित.

आपल्या वडिलांबद्दल असणारे प्रेम, जिव्हाळा आणि आदर ‘फादर्स डे’च्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर करून व्यक्त केला.

फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिेले की, ‘लहानपणाची स्पेशल आठवण म्हणजे, चेस खेळताना मला जिंकू देण्यासाठी तुम्ही मुद्दामहून हरायचे. मोनोपॉलीच्या खेळात मात्र तुम्ही नेहमी जिंकायचे.

तुमच्यासारखा पिता हे खरोखरंच खूप भाग्याची गोष्ट आहे.’ इरा सध्या मित्रमैत्रिणींसोबत प्रथमच विदेशात फिरायला गेली आहे.

तिला जाण्याची परवानगी देण्यापूर्वी आमिरने तिच्यासमोर ‘रोज दर चार तासाला फोन करायचा’ अशी अट ठेवली होती. इरानेसुद्धा ती मान्य केली. त्यामुळे या बाप-लेकीच नातं फारच जिव्हाळ्याचे दिसते.

Ira Khan and Aamir Khan

Web Title: Aamir's special bonding with the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.