​आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 18:36 IST2016-12-16T18:26:41+5:302016-12-16T18:36:05+5:30

Aamir Khan’s Special Appearance in Secret Superstar ; ‘दंगल’नंतर आमिरचा नवा चित्रपट ‘सिक्रेट सपुरस्टार’ हा असणार आहे. या चित्रपटाचे टीझर आमिरने आज शुक्रवारी लाँच केले. यात तो दंगलमधील झायरा वसीम सोबत दिसेल.

Aamir's 'Secret Superstar' teaser release | ​आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज

​आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर रिलीज

ong>आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. कोणतेही काम करताना तो किती मेहनत घेतो हे ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमधून दिसतेच आहे. मात्र, काही गोष्टी तो सिक्रेटली करतो हे आपल्याला मान्यच करावे लागेल. याचे कारणही तसेच आहे. ‘दंगल’नंतर आमिरचा नवा चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा असणार आहे. 

काही दिवसांपूर्वी ‘मी तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येणार आहे’ असे आमिर खानने एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले होते. आमिर आता कोणते सरप्राईज देणार याची सर्वांनाचा उत्सुकता होती. ‘सिक्रे ट सुपरस्टार’ हा चित्रपटाबाबत तो सांगत होता याचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील टीझर लाँच करण्यापूर्वी सर्वच गुपित ठेवण्यात आले होते. 

Aamir Khan’s Special Appearance in Secret Superstar

‘सिक्रेट सुपरस्टार’च्या टीझरमधून एक मुलगी आपला आवाज जगात पोहचावा हे स्वप्न पाहत आहे. तिच्या आईचा देखील तिच्या या स्वप्नाला पाठिंबा असला तरी तिच्या वडिलांचा या सगळ्याला नकार असतो. तिला आपल्या स्वप्नांची जाणीव होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ती हिजाब घालून गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करते. यानंतर आमिरकडे कॅमेरा वळविण्यात आला आहे. ‘इट इज सुपरहिट. पसंद आया तो लाइक करो और नही आया तो टेस्ट चेन्ज करो,’ असे आमिर म्हणताना दिसतो. 

‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर लाँच करताना आमिर म्हणाला, झायरा वसीम यात प्रमुख भूमिका साकारत आहे. माझी भूमिका या चित्रपटातील तडका आहे. आम्ही हा चित्रपट आठ महिन्यात पूर्ण करण्याचे ठरविले आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदन म्हणाला, यात आमिरची भूमिका गॉडफादर सारखी असेल. या चित्रपटात आमिरची भूमिका वेगळ्या धाटणीची आहे. मी पटकथा सांगितल्यानंतर त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला असेही तो म्हणाला. 



सिक्रेट सुपरस्टारचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले असून आमिर आणि त्याची पत्नी किरण यांनी याची निर्मिती केली आहे.

Web Title: Aamir's 'Secret Superstar' teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.