‘कॉफी विथ करण’ या शोवर आमिर जाणार त्याच्या मुलींसोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 19:08 IST2016-12-09T19:08:49+5:302016-12-09T19:08:49+5:30

चित्रपटाचे प्रमोशन म्हटल्यावर केवळ दोनच टीव्ही शो डोळयासमोर येतात. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ आणि सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो‘बिग ...

Aamir will be seen in 'Coffee with Karan' with his daughters ... | ‘कॉफी विथ करण’ या शोवर आमिर जाणार त्याच्या मुलींसोबत...

‘कॉफी विथ करण’ या शोवर आमिर जाणार त्याच्या मुलींसोबत...

त्रपटाचे प्रमोशन म्हटल्यावर केवळ दोनच टीव्ही शो डोळयासमोर येतात. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ आणि सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो‘बिग बॉस’. चाहत्यांसोबत थेट संवाद साधण्याचं हे अगदी प्रबळ माध्यम आहे. म्हणून आमिर खानने देखील हाच पर्याय निवडला. तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दंगल’च्या प्रमोशनमध्ये अत्यंत व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आता करणच्या ‘कॉफी विथ करण’ शोवर जाणार असल्याचे सुत्रांकडून कळतेय. एवढेच नव्हे तर तो त्याच्या आॅनस्क्रीन मुली गीता-बबिता म्हणजेच फातिमा सना शेख आणि सन्या मल्होत्रा यांच्यासोबत शोवर जाणार आहे.

                           

सुपरस्टार सलमान खानच्या ‘सुल्तान’ने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्यानंतर सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली ती आमिरच्या ‘दंगल’ ची. आमिर खानचा ‘दंगल’ चित्रीकरणाअगोदरपासून चर्चेत होता. आता लवकरच आमिर खान त्याच्या दोन आॅनस्क्रीन मुलींसोबत ‘कॉफी विथ करण’ या शोवर जाणार आहे. हा शो १० डिसेंबरला शूट होणार आहे. यामाध्यमातून ते टिव्हीवरही त्यांचा स्मॉल स्क्रिन डेब्यू करत आहेत. शोमुळे प्रथमच ते तिघे निवांतपणे गप्पाटप्पा करू शकतील. हा शो १७ डिसेंबरला प्रसारित करण्यात येणार असल्याचे कळतेय. आमिर खान स्वत: या शोचे चित्रीकरण केव्हा होणार याकडे लक्ष लावून बसलाय. तिघांनाही एकत्र पाहणं, अनुभव ऐकणं ही खरंच एक पर्वणी ठरणार आहे.       

Web Title: Aamir will be seen in 'Coffee with Karan' with his daughters ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.