‘मेंटल’मधून कमबॅक करणार आमिर खानचा लहान भाऊ फैसल खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 22:00 IST2017-07-29T16:30:03+5:302017-07-29T22:00:03+5:30

शारिक मिन्हाज यांच्या ‘मेंटल’ (तात्पुरते ठेवलेले नाव) या चित्रपटातून मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा लहान भाऊ फैसल खान कमबॅक करणार ...

Aamir Khan's younger brother, Faisal Khan, will make a comeback from 'Mental' | ‘मेंटल’मधून कमबॅक करणार आमिर खानचा लहान भाऊ फैसल खान!

‘मेंटल’मधून कमबॅक करणार आमिर खानचा लहान भाऊ फैसल खान!

रिक मिन्हाज यांच्या ‘मेंटल’ (तात्पुरते ठेवलेले नाव) या चित्रपटातून मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा लहान भाऊ फैसल खान कमबॅक करणार आहे. चित्रपटाविषयी फैसल सांगतो की, ‘हा नव्या जमान्यातील चित्रपट आहे, विशेषत: नव्या पिढीसाठी हा चित्रपट खूपच महत्त्वपुर्ण आहे. जे एकतर्फी प्रेमात वेडे झालेले असतात, पुढे चुकीचे निर्णय घेतात आणि अनैतिक होतात अशा तरुणांसाठी चित्रपटात खूप चांगला संदेश दिला आहे.’ फैसल आणि मिन्हाज यांनी या अगोदर ‘चांद बुझ गया’ आणि ‘चिनार दास्तान-ए-इश्क’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

फैसलने म्हटले की, या अगोदर आम्ही ज्या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, त्यांच्या तुलनेत या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. ‘मेंटल’ची कथा एकतर्फी प्रेमाच्या अवतीभोवती फिरणारी असून, आपले प्रेम मिळविण्यासाठी यातील तरूण कुठलीही पातळी ओलाडण्यास तयार असतो. पुढे तर तो मानसिक रुग्ण होतो. पुढे बोलताना फैसलने म्हटले की, मी चित्रपटांची संख्या वाढविण्यापेक्षा गुणवत्तापुर्र चित्रपट करण्यावर भर देतो. या चित्रपटाला होकार देण्याअगोदर मी पटकथा समजुन घेतली. जेव्हा शारिक मिन्हाजने मला पटकथा आणि माझ्या भूमिकेविषयी सांगितले तेव्हा मी खूपच उत्साहित झालो. 

‘मेंटल’ या चित्रपटाची शूटिंग आॅगस्टमध्ये सुरू होणार असून सुरत, दमन, सापुतारा आणि मुंबईतील काही भागांमध्ये केली जाईल. फैसल या चित्रपटातील भूमिकेसाठी एकदम फिट बसत असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. ‘मेला’ या चित्रपटात फैसलने भाऊ आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केले होते. फैसलने १९६९ मध्ये ‘प्यार का मौसम’ या चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मधल्या काळात तो इंडस्ट्रीमधून गायब झाला होता. 

Web Title: Aamir Khan's younger brother, Faisal Khan, will make a comeback from 'Mental'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.