आमिर खानच्या दंगलने गाठला 2000 कोटींची टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 12:05 IST2017-06-28T06:35:38+5:302017-06-28T12:05:38+5:30
आमिर खानचा चित्रपट दंगल एका नंतर एक नवे रेकॉर्ड बनवते आहे. दंगलने जगभरात 2000 कोटींची कमाई केली आहे. भारतासह ...

आमिर खानच्या दंगलने गाठला 2000 कोटींची टप्पा
आ िर खानचा चित्रपट दंगल एका नंतर एक नवे रेकॉर्ड बनवते आहे. दंगलने जगभरात 2000 कोटींची कमाई केली आहे. भारतासह जगभरात एवढा बिझनेस करणार दंगल हा पहिलाच सिनेमा ठरलायय चीनममध्ये दंगलने अडीच कोटी कमावले. चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवाणार पहिलाच नॉन- हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. दंगल बरोबरच एस.एस. राजामौली यांचा बाहुबली-2 ने जगभरात ताबडतोब कमाई केली आहे. बाहुबली2 नंतर दंगल 1500 कोटींचा गल्ला जमावणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. मात्र आता दंगलने बाहुबलीसुद्धा मागे सोडले आहे. 23 डिसेंबर 2016 ला रिलीज झालेला दंगल चित्रपट चीनमध्ये 5 मे रोजी 9000 स्क्रीनवर रिलीज करण्यात आला होता. रिलीज झाल्यानंतर 1 महिनानंतरही हा चित्रपट अजून ही हाऊसफुल्ल सुरु आहे.
दंगलच्या यशामुळे आमिर चीनमध्ये नरेंद्र मोदींहुन अधिक प्रसिद्ध झाला आहे. दंगलने चिनी बॉक्स ऑफीसवर कॅप्टन अमेरिका , ट्रान्सफॉर्मर्स ,कुंगफू पांडा 3 सारख्या दिग्गज सिनेमांना मागे टाकलयं. दंगल हा चित्रपट कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. याचित्रपटात आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. सध्या आमिर त्याच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी आहे. यश राज बॅनर खाली तयार होणाऱ्या या चित्रपटात आमिर खानसह अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. बिग बी अमिताभ बच्चन आमिर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्तान 2018च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.