आमिर खानच्या घरी वाजणार सनई चौघडे! लेक आयरा खान नुपुर शिखरेसोबत महाराष्ट्रीयन पद्धतीनं घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 03:11 PM2023-12-29T15:11:10+5:302023-12-29T15:11:40+5:30

Ira Khan Wedding : आमिर खानची मुलगी आयरा खान हिच्या लग्नाची सध्या जोरात तयारी सुरू आहे. या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.

Aamir Khan's daughter ira Khan will knot tie with Nupur Shikhare in Maharashtrian style | आमिर खानच्या घरी वाजणार सनई चौघडे! लेक आयरा खान नुपुर शिखरेसोबत महाराष्ट्रीयन पद्धतीनं घेणार सातफेरे

आमिर खानच्या घरी वाजणार सनई चौघडे! लेक आयरा खान नुपुर शिखरेसोबत महाराष्ट्रीयन पद्धतीनं घेणार सातफेरे

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान(Aamir Khan)च्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. खरंतर, अभिनेत्याची मुलगी आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. आयरा खान आणि नुपूरचे लग्न महाराष्ट्रीय रितीरिवाजानुसार होणार आहे.

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इटलीमध्ये एंगेजमेंट झाली होती. दोन महिन्यांनंतर, जोडप्याने एक इंटिमेट एंगेजमेंट पार्टी आयोजित केली. आमिरचे संपूर्ण कुटुंब आणि त्याची माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव, अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्यासह जवळचे मित्र या पार्टीत सहभागी झाले होते. आयरा आणि नुपूरच्या एंगेजमेंटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तो दिवस जवळ आला आहे जेव्हा आमिरची मुलगी सासरी जाणार आहे. आयरा आणि नुपूर ३ जानेवारीला लग्न करणार आहेत.

आयरा आणि नुपूरचे लग्न आणि रिसेप्शन कधी आहे?
न्यूज १८ च्या रिपोर्ट्सनुसार, आमिर खानच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमाशी संबंधित तपशील स्त्रोताकडून प्राप्त झाला आहे. रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की, “खान कुटुंब खूप आनंदी आहे कारण ते नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहेत. आयरा आणि नुपूरचे लग्न ३ जानेवारीला वांद्रे येथील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टी होतील - एक दिल्लीत आणि दुसरे जयपूरमध्ये.

बी टाऊनमधील मित्रांना पाठवणार निमंत्रण
रिपोर्टनुसार, हे देखील कळले आहे की आमिर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्साहित आहे आणि अभिनेता वैयक्तिकरित्या बी-टाऊनमधील त्याच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आणि जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी कॉल करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “बहुतेक कलाकार सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. जे त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत, ते जयपूरमधील रिसेप्शनचा भाग असतील. 

Web Title: Aamir Khan's daughter ira Khan will knot tie with Nupur Shikhare in Maharashtrian style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.