आमिर खानची लेक इरा खान गुंतलीय लग्नाच्या तयारीत, आमिरच्या घरी होणार आहे लवकरच लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:56 IST2021-02-04T17:52:17+5:302021-02-04T17:56:45+5:30

इराने इन्स्टाग्राम स्टोरीत लग्नाच्या तयारीचे फोटो पोस्ट केले आहेत.

Aamir Khan's daughter Ira Khan shares glimpses of cousin Zayn Marie's wedding preparation | आमिर खानची लेक इरा खान गुंतलीय लग्नाच्या तयारीत, आमिरच्या घरी होणार आहे लवकरच लग्न

आमिर खानची लेक इरा खान गुंतलीय लग्नाच्या तयारीत, आमिरच्या घरी होणार आहे लवकरच लग्न

ठळक मुद्देइराची चुलत बहीण झेन मॅरीचे लवकरच लग्न होणार असून इराने इन्स्टाग्राम स्टोरीत तिच्या लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. इरा तिच्या या लाडक्या बहिणाच्या लग्नाच्या तयारीकडे विशेष लक्ष देत आहे हे या पोस्टवरून आपल्या लक्षात येत आहे.

इरा खानने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही, ती थिएटर आणि दिग्दर्शनात तिची आवड जोपासत आहे. आमिर खानची मुलगी म्हणून इरा खान सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे लाखोंमध्ये फॉलोअर्सही आहेत. इरादेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीचे फोटो पोस्ट केले आहेत.

इराची चुलत बहीण झेन मॅरीचे लवकरच लग्न होणार असून इराने इन्स्टाग्राम स्टोरीत तिच्या लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. इरा तिच्या या लाडक्या बहिणाच्या लग्नाच्या तयारीकडे विशेष लक्ष देत आहे हे या पोस्टवरून आपल्या लक्षात येत आहे. 

झेन मॅरी ही देखील एक अभिनेत्री आहे .तिने नेटफ्लिक्सवरील ‘मिसेस सीरियल किलर’ या चित्रपटातून अभिनयातील प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, मनोज वाजपेयी आणि मोहित रैना यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तसेच तिने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले होते. झेन ही दिग्दर्शक मन्सूर खान यांची मुलगी आहे. मन्सूर यांनी ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ असे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

इरा खानदेखील काही महिन्यांपूर्वी प्रेमात पडली आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. ती वडिलांच्याच फिटनेस कोच नुपूर शिखरला डेट करत आहे. नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अप्रत्यक्षणे दोघांच्या प्रेमाची कबुली दिली होती. गेल्या वर्षी मिसल कृपलानीसोबत इरा खानचे अफेअर होते. दोघांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण काहीच महिन्यांत त्यांचे ब्रेकअप झाले.

Web Title: Aamir Khan's daughter Ira Khan shares glimpses of cousin Zayn Marie's wedding preparation