आमिर खान म्हणतो, मी box-office king ​नाही; मी केवळ ‘ Kiran’s king’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:22 IST2017-02-05T09:52:47+5:302017-02-05T15:22:47+5:30

बॉलिवूड मेगास्टार आमिर खान सध्या ‘दंगल’च्या यशाची चव चाखतोय. काल आमिर आणि त्याच्या ‘दंगल गर्ल्स’नी सक्सेस पार्टी साजरी केली. ...

Aamir Khan says I'm not a box-office king; I only 'Kiran's king' | आमिर खान म्हणतो, मी box-office king ​नाही; मी केवळ ‘ Kiran’s king’

आमिर खान म्हणतो, मी box-office king ​नाही; मी केवळ ‘ Kiran’s king’

लिवूड मेगास्टार आमिर खान सध्या ‘दंगल’च्या यशाची चव चाखतोय. काल आमिर आणि त्याच्या ‘दंगल गर्ल्स’नी सक्सेस पार्टी साजरी केली. ‘दंगल’ने बॉक्सआॅफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. आता अशास्थितीत आमिरला ‘बॉक्सआॅफिसचा किंग’म्हणणे साहजिक आहे. पण कदाचित आमिर असे मानत नाही. मी केवळ किरणचा (किरण म्हणजे, आमिरची पत्नी किरण राव) किंग आहे, असे आमिर म्हणाला.



शनिवारी रात्री ‘दंगल’ची सक्सेस पार्टी रंगली. या पार्टीला  बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी आमिरला कुणीतरी ‘बॉलिवूड किंग’ संबोधले. पण आमिरने अगदी विनम्रपणे ‘बॉक्सआॅफिस किंग’ची उपाधी नाकारली. मला ‘बॉक्सआॅफिस राजा’ म्हणू नका. मी केवळ किरणच्या हृदयावर राज्य करणारा ‘राजा’ आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. कुठला चित्रपट किती बिझनेस करेल, याचा विचार करून मी चित्रपट करत नाही. मी नेहमी आपल्या मनाची हाक ऐकतो आणि मनाची हाक ऐकूनच चित्रपट स्वीकारतो. ‘तारे जमीं पे’,‘३ इडिएट्स’,‘ रंग दे बसंती’,‘सरफरोश’ हे सगळे माझ्या हृदयाच्या जवळच्या सिनेमे आहेत. मी ज्यावेळी हे चित्रपट स्वीकारले, त्यावेळी ते इतका चांगला बिझनेस करतील, याचा विचारही केला नव्हता. मी खरोखर केवळ बॉक्सआॅफिसवर डोळा ठेवून चित्रपट केले असते तर किरणचा ‘धोबी घाट’ हा सिनेमा मी केलाच नसता. ‘दंगल’मध्ये मी वयापेक्षा कितीतरी मोठी भूमिका साकारली. खरे तर ही मोठी रिस्क होती. पण तरिही हा चित्रपट मी केला. कारण त्याची कथा कुठेतरी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली.

माझ्यासाठी बॉक्सआॅफिसवरचा बिझनेस नाही तर प्रेक्षकांचे, माझ्या चाहत्यांचे प्रेम अधिक महत्त्वाचे आहे, हे सांगायलाही आमिर विसरला नाही.
 
ALSO READ : आमिर खानच्या ‘दंगल’ पार्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा!
म्हणून दिसला नाही आमिर खान जॅकी चैनच्या 'कुंग फू योगा'मध्ये

Web Title: Aamir Khan says I'm not a box-office king; I only 'Kiran's king'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.