अभिनयातून संन्यास घेणार होता आमिर खान, स्वत: केला खुसाला, म्हणाला- मी खूप अस्वस्थ होतो....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:06 AM2023-10-11T11:06:35+5:302023-10-11T11:14:41+5:30

आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. तो आपल्या प्रत्येक सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतो.

Aamir khan says he almost left movies because he was disturbed and unhappy | अभिनयातून संन्यास घेणार होता आमिर खान, स्वत: केला खुसाला, म्हणाला- मी खूप अस्वस्थ होतो....

अभिनयातून संन्यास घेणार होता आमिर खान, स्वत: केला खुसाला, म्हणाला- मी खूप अस्वस्थ होतो....

आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. तो आपल्या प्रत्येक सिनेमासाठी जीवतोड मेहनत करतो. ३ इडियट्स, लगान आणि दंगल ही सिनेमा त्याचच उदाहरण आहेत. त्याचा प्रत्येक सिनेमा हा पहिल्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. कोणतीही भूमिका तो पडद्यावर जीवंत करतो. सध्या आमिर खानच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकत नाहीत. त्यानंतर सध्या आमिर खानने सिनेमातून ब्रेक घेत कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. आमिर खान म्हणाला, मुलं नसती तर फार पूर्वीच त्याने चित्रपट काम करणं बंद केलं असतं. कुटुंबासोबत वेळ घालवता न आल्याने तो स्वतःवर चिडला असे आमिरने म्हटले आहे.

मी खूप काम केले. गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या कुटुंबाला वेळ दिला नाही म्हणून मी खूप अस्वस्थ होतो. माझी तीन मुलं आता मोठी होत आहेत. मी नेहमीच माझ्या कामाला खूप महत्त्व दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून मला खूप राग आला आहे. यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला ब्रेकची गरज असल्याचे सांगितले. यानंतर मलाही वाटले की, आई आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवावा.

आमिर खानने सांगितले की, माझ्या कामादरम्यान मी कधीही कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. माझा मुलगा जुनैद आज 30 वर्षांचा झाला आहे. आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे. जुनैद त्याच्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. पण लहानपणी जुनैद आणि आयराला मी जास्त वेळ देऊ शकलो नाही. आज मला या सगळ्या गोष्टींची आता जाणीव होत आहे. आमिर खानने तर सांगितले की, तो  अभिनय सोडण्यास तयार आहे.

आमिर खान म्हणतो, 'मी बराच काळ काम करत होतो. मी नेहमी फक्त माझ्या कामाचाच विचार केला. खूप काम झाले. पण गेल्या काही वर्षांपासून माझी खूप चिडचिड झाली होती. मी अभिनय सोडण्याचा निर्णयही घेतला होता. पण जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की कोणतीही गोष्ट टोकाचा निर्णय घेऊ नये. इतर लोकांप्रमाणे तू ही यामधील काही पर्याय मार्ग शोधून काढ.  

Web Title: Aamir khan says he almost left movies because he was disturbed and unhappy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.