​कॅटरिनाबद्दल विचालेल्या प्रश्नावर आमिर खान म्हणाला, ‘टोटली झूठ है’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 15:50 IST2017-08-02T10:18:09+5:302017-08-02T15:50:52+5:30

आमिर खानचा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सध्या चर्चेत आहे तो कॅटरिना कैफमुळे. या चित्रपटात कॅटरिना महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे ...

Aamir Khan said, "Totally is a lie!" | ​कॅटरिनाबद्दल विचालेल्या प्रश्नावर आमिर खान म्हणाला, ‘टोटली झूठ है’!

​कॅटरिनाबद्दल विचालेल्या प्रश्नावर आमिर खान म्हणाला, ‘टोटली झूठ है’!

िर खानचा आगामी चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सध्या चर्चेत आहे तो कॅटरिना कैफमुळे. या चित्रपटात कॅटरिना महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे सांगण्यात येते आहे. पण बॉलिवूडच्या आतल्या गोटाचे खरे मानाल तर, कॅटला तिच्या वाट्याला आलेली यातील भूमिका फार काही आवडली नाही. म्हणजेच ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आपल्या भूमिकेबाबत कॅट समाधानी नाही. आता कॅट समाधानी नाही, म्हटल्यावर बातमी कानोकानी होणारच. बातमी कानोकानी गेली आणि शेवटी आमिर खानच्या कानापर्यंतही पोहोचली. मग काय, आमिरला यावर उत्तर देणे भागच होते.



‘सीक्रेट सुपरस्टार’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी आमिरला थेटपणे याबद्दल विचारने गेले. यावर आमिरने काय उत्तर दिले माहितीयं. ‘टोटली झूठ है,’ असे तो म्हणाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या संपूर्ण चित्रपटात कॅटरिनाचा केवळ १० ते २० मिनिटांचा रोल आहे. यामुळे कॅट सध्या चिंतेत आहे. आता खरे काय, हे कॅटलाच ठाऊक़ कारण आमिर तर असे काही मानायला तयार नाही. 
या चित्रपटात कॅटरिना एका शूर राजकुमारीची भूमिका साकारताना दिसणार आहे.  चित्रपटात कॅट राजस्थानी लूकमध्ये दिसेल. त्यामुळे कॅटच्या नाकात मोठी नोझ रिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आता यासाठी कॅटरिना नाक टोचेल की नाही, हे अद्याप कळलेले नाही. कारण आमिर खानने स्वत: आपल्या भूमिकेसाठी शरिरातील अनेक भागांवर टोचून घेतले आहे.  कॅटरिनाच्या डोळ्यांवरही खूप काम केले जाणार आहे. यात तिचे डोळे एकदम ‘नशीले’ असतील. डोळे, ज्यात अनेक रहस्ये दडलेली असतील, या डोळ्यांत पाहिल्यानंतर कुणीही हरवेल. चित्रपटात कॅटरिना राजस्थानी पारंपारिक वेषात दिसेल. घाघरा चोलीसारख्या तिच्या पोशाखाचा रंग ब्रॉऊन असू शकतो . या चित्रपटात आमिर व कॅटरिना यांच्याशिवाय अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  सध्या कॅटरिना ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे.

Web Title: Aamir Khan said, "Totally is a lie!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.