आमिर खानला पहिली पत्नी आणि मुलांविषयी ‘या’ गोष्टीमुळे होतोय पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 14:17 IST2017-10-03T08:10:31+5:302017-10-03T14:17:05+5:30

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ या दिवाळीला रिलीज होत आहे. या चित्रपटात आमिरबरोबर जायरा वसीम प्रमुख भूमिका साकारताना ...

Aamir Khan is regretting the first wife and children about 'this' thing. | आमिर खानला पहिली पत्नी आणि मुलांविषयी ‘या’ गोष्टीमुळे होतोय पश्चाताप!

आमिर खानला पहिली पत्नी आणि मुलांविषयी ‘या’ गोष्टीमुळे होतोय पश्चाताप!

स्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ या दिवाळीला रिलीज होत आहे. या चित्रपटात आमिरबरोबर जायरा वसीम प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. याअगोदर हे दोघे ‘दंगल’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. आमिरविषयी सांगायचे झाल्यास तो सध्या त्याच्या चित्रपटांबरोबरच परिवारालाही पुरेसा वेळ देण्यास प्राधान्य देत आहे. हे आम्ही नाही तर खुद्द आमिरने संगितले आहे. एका वेबसाइटला मुलाखत देताना आमिरने याबाबतचा खुलासा केला असून, त्याने त्याच्या पहिल्या वैवाहिक जीवनाविषयीदेखील काही महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहेत. त्याने म्हटले की, मी पहिली पत्नी आणि मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता, आज मला यामुळे पश्चाताप होतो. 

जेव्हा आमिरला इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण करताना काय मिळविले अन् काय गमविले असे विचारण्यात आले तेव्हा त्याने अतिशय भावनिक अशा स्वरूपाचे उत्तर दिले. आमिर म्हणाला की, ‘खरं आहे मी इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण करीत आहे. यादरम्यान मला लोकांचे खूप प्रेम मिळाले. पैसा, प्रसिद्धी मिळाली. मी खूप काही मिळविले परंतु गमविले काय? हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. मला असे वाटते की, मी माझी आई, पहिली पत्नी रिना आणि मुलांसोबत केवळ त्यांच्या अडचणीत उभा राहिलो. मला असे वाटते की, मी त्यांना अधिक वेळ द्यायला हवा होता. मोठा मुलगा जुनेद आणि आयराला मी अधिक वेळ देऊ शकलो नसल्याचा पश्चाताप होतो. आता माझी अशी इच्छा आहे की, मी माझ्या आयुष्याच्या प्रवासाविषयी काही तरी लिहून, ते सिल करू ठेवावे. जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा माझ्या वकिलाने ते सर्वांसमोर वाचावे. 



यावेळी आमिरला ‘तू तुझ्या परिवाराला आता किती वेळ देतो’ असेही विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, ‘मी जुनेद आणि आयराला जास्त वेळ देऊ शकत नाही. मात्र आता मी ठरविले आहे की, आजादला (लहान मुलगा) दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान वेळ देणार. मला आजादजवळ राहायला आवडते. त्याला दररोज मी एक कथा सांगत असतो, त्यानंतर त्याला झोपवितही असतो. त्याचा टीव्ही बघण्याचा वेळही आम्ही निश्चित केला आहे. त्याला दररोज आम्ही अर्धातास टीव्ही बघू देतो. त्यापेक्षा अधिक वेळ आम्ही त्याला टीव्हीजवळ बसू देत नाही. 



पुढे बोलताना आमिरने सांगितले की, ‘मला आठवते की, जुनेदला मी पहिला मोबाइल त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर घेऊन दिला होता. कारण रिनाने (आमिरची पहिली पत्नी) म्हटले होते की, मुलगा जेव्हा कॉलेजला जाईल तेव्हा त्याच्याशी संपर्क साधणे सोपे होईल. याअगोदर आम्ही जुनेदला स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत तू मोबाइलचे बिल भरण्यास सक्षम होत नाही, तोपर्यंत तुला मोबाइल दिला जाणार नाही. जुनेद सध्या थिएटर करीत आहे, तर आयरा तिचे शिक्षण पूर्ण करीत आहे. जुनेदने ‘पीके’मध्ये राजू हिरानी यांना असिस्ट केले होते. आयरा हिनेदेखील राम माधवानी यांना काही जाहिरातींमध्ये असिस्ट केले आहे. 

Web Title: Aamir Khan is regretting the first wife and children about 'this' thing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.