​आमिर खानने पत्नीला केला प्रश्न; ‘आप अ‍ॅक्टिंग क्यों नहीं करती?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:07 IST2017-08-04T08:37:29+5:302017-08-04T14:07:29+5:30

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खान जे काही बोलतो ते अगदी विचारपूर्वक बोलतो, याबाबत काहीही दुमत नसावे. अ‍ॅक्टिंगसोबतच या सगळ्या गुणांमुळेच कदाचित ...

Aamir Khan questioned wife; 'Why do not you act?' | ​आमिर खानने पत्नीला केला प्रश्न; ‘आप अ‍ॅक्टिंग क्यों नहीं करती?’

​आमिर खानने पत्नीला केला प्रश्न; ‘आप अ‍ॅक्टिंग क्यों नहीं करती?’

िस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खान जे काही बोलतो ते अगदी विचारपूर्वक बोलतो, याबाबत काहीही दुमत नसावे. अ‍ॅक्टिंगसोबतच या सगळ्या गुणांमुळेच कदाचित तो बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणवला जातो. एका ताज्या इव्हेंटमध्ये आमिर असेच काही बोलला. तेही अगदी विचारपूर्वक.
औचित्य होते, ‘सीक्रेट स्टार’ या आमिरच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचे. या इव्हेंटला आमिरसोबत त्याची पत्नी किरण राव ही सुद्धा हजर होती. पत्रकारांसोबत गप्पाटप्पा सुरु असताना आमिर अचानक पत्नी किरणकडे वळला आणि तिच्याकडे त्याने एक प्रश्न टाकला. हा प्रश्न काय होता? तर ‘आप अ‍ॅक्टिंग क्यों नहीं करती?’. होय, आमिरने हा प्रश्न थेट किरणला विचारला. केवळ इतकेच नाही तर किरण खूप उत्तम अभिनेत्री आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, असे पुढे तो पत्रकारांना उद्देशून म्हणाला. याचा अर्थ एकच, किरणने अ‍ॅक्टिंग करावी, हिच मनातील इच्छा जणू आमिरने सर्वांसमोर बोलून दाखवली. 

‘आप अ‍ॅक्टिंग क्यों नहीं करती?’ या प्रश्नावर उत्तर देण्याची पाळी आता किरणची होती. या प्रश्नाला उत्तर देताना किरण थेट तिच्या कॉलेजच्या आठवणींत हरवून गेली. होय, मी अ‍ॅक्टिंग केलीय. केवळ केली नाही तर मनापासून एन्जॉय केलीय. कॉलेजमध्ये मी खूप अभिनय करायचे. पुढे मी दिग्दर्शन स्विकारले. हे खरे की, दिग्दर्शन करताना मी अभिनयात फार रूची घेतली नाही. पण मला थिएटर करण्याची इच्छा आहे. रिटायर झाल्यावर मी निश्चितपणे थिएटर करेल, असे किरण म्हणाली. किरणच्या या उत्तरावर आमिर नुसता हसला. कदाचित त्याला जे म्हणायचे, ते किरणपर्यंत अगदी अचूक पोहोचले होते.

Web Title: Aamir Khan questioned wife; 'Why do not you act?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.