कोरोनाच्या जाळ्यात अडकला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा', वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 13:15 IST2020-04-18T13:07:41+5:302020-04-18T13:15:56+5:30
कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे.

कोरोनाच्या जाळ्यात अडकला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा', वाचा सविस्तर!
कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे. इंडस्ट्रीचे 1000 पेक्षा जास्त लोकांचे नुकसान झाले आहे. अनेक मोठ्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याचा परिणाम आमिर खानचा सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'वर सुद्धा पडला आहे. या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार नाही.
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार आमिर खान आणि करिना कपूरचा सिनेमा लाल सिंह चड्ढा यावर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार नाही. सिनेमाची रिलीज डेट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग मध्येच थांबवण्यात आले त्यामुळे सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम होणार कसे ? त्यामुळे सिनेमा यावर्षी रिलीज होणे शक्य नाही आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अतुल कुलकर्णी द्वारा लिखित 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट अद्वैत चंदन द्वारा दिग्दर्शित करण्यात आला आहे. लाल सिंग चड्ढा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूडचा रिमेक आहे.