'या' अभिनेत्याचा नकार अन् सलमान खान झाला सुपरस्टार, नाकारला 'हम आपके है कौन' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:06 AM2023-08-07T09:06:24+5:302023-08-07T09:13:06+5:30

सलमान खानच्या कारकिर्दीतील सुपरहिट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे.

aamir khan has rejected hum aapke hai kaun film offer after that it went to salman khan | 'या' अभिनेत्याचा नकार अन् सलमान खान झाला सुपरस्टार, नाकारला 'हम आपके है कौन' सिनेमा

'या' अभिनेत्याचा नकार अन् सलमान खान झाला सुपरस्टार, नाकारला 'हम आपके है कौन' सिनेमा

googlenewsNext

1994 साली आलेल्या सूरज बडजात्या यांच्या 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) सिनेमाने बॉलिवूडमध्ये बेंचमार्कच सेट केला. रोमान्स, गाणी, उत्तम कथा, फॅमिली ड्रामाने पूर्ण असा हा सिनेमा प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतो. इतक्या वर्षांनंतरही हा सिनेमा लोक आवडीने पाहतात. यातील माधुरी (Madhuri Dixit) आणि सलमानची (Salman Khan) केमिस्ट्री गाजली. तसंच रेणुका शहाणे सर्वांची आवडती 'भाभी' बनली. सलमान खानच्या कारकिर्दीतील सुपरहिट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. पण तुम्हाला माहितीये या चित्रपटाची ऑफर सलमान खानच्या आधी दुसऱ्याच अभिनेत्याला मिळाली होती.

बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान (Aamir Khan) खरं तर या 'हम आपके है कौन' साठी पहिली पसंत होती. होय, सूरज बडजात्या यांनी ही ऑफर आधी आमिरला दिली होती. मात्र त्याला स्क्रिप्ट इतकी चांगली वाटली नाही म्हणून त्याने 'प्रेम' ही भूमिका नाकारली. सूरज बडजात्या यांनी सिनेमाचं दिग्दर्शन तर केलंच होतं मात्र फिल्मची स्क्रीप्ट लिहायला त्यांना २ वर्षांचा कालावधी लागला. उटीमध्ये फिल्मचं शूट पूर्ण झालं आणि सिनेमा पूर्ण व्हायला ४ वर्ष लागले. हा सिनेमा 1982 साली आलेल्या राजश्री प्रोडक्शच्या बॅनरखाली बनलेल्या 'नदिया के पार' चा रिमेक होता. 

'हम आपके है कौन' मध्ये माधुरी दीक्षित, सलमान खान, मोहनीश बहल, रेणुका शहाणे, आलोकनाथ, अनुपम खेर, सतीश शाह आणि दिलीप जोशी यांची मुख्य भूमिका होती. ही फिल्म सर्वाधिक कमाई करणारी पहिली बॉलिवूड फिल्म बनली.

Web Title: aamir khan has rejected hum aapke hai kaun film offer after that it went to salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.