आमिर खानची एक्स पत्नी किरण रावची झाली अपेंडिक्स सर्जरी, हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, दिले हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:51 IST2025-12-29T10:50:33+5:302025-12-29T10:51:43+5:30
किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.

आमिर खानची एक्स पत्नी किरण रावची झाली अपेंडिक्स सर्जरी, हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, दिले हेल्थ अपडेट
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किरण रावची सर्जरी झाली आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना याबाबत माहिती देत तिचे हेल्थ अपडेट शेअर केले आहेत. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.
किरण रावने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, "मी २०२६चं स्वागत धुमधडाक्यात करायला पूर्णपणे तयार होते. तेवढ्यात माझ्या अपेंडिक्सने मला आठवण करून दिली की मी हळू गेलं पाहिजे, लांब श्वास घेतला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे". किरण रावने पोस्टमधून या हॉस्पिटल स्टाफ, डॉक्टर आणि तिच्या मदतीसाठी आलेल्या सगळ्यांचे आभार मानले आहेत.
"मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते या आधुनिक वैद्यकशास्त्राची (अजूनही कळत नाही. १२ मिमीचा अपेंडिक्स १०.५ मिमी कॅथेटरमधून कसा काढला? देव जाणे, मी डॉक्टर नाही हे नशीब). डॉ. कायोमार्झ कपाडिया आणि संपूर्ण शस्त्रक्रिया टीमची मी आभारी आहे. इरा, पोपाय आणि शेफाली यांनी काळजी घेतली. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलची सेवा अप्रतिम आहे. वेळेवर मदतीला धावून आलेले माझे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय (आमिर, चार्ल्स आणि अमीन), आणि बाकीच्या माझ्या प्रियजनांची जे प्रामुख्याने माझ्या फुगलेल्या ओठांवर हसत होते (अॅलर्जिक रिअॅक्शन होती; दुर्दैवाने आता ते परत नॉर्मल आणि अन-ग्लॅम झाले आहेत…)त्या सगळ्यांची आभारी आहे", असं पुढे तिने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "आता डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी घरी परतले आहे. नवीन वर्षात हळूहळू, शांतपणे पाऊल टाकायला तयार आहे. २०२५ मला चांगलं गेलं. २०२६ सगळ्यांना दयाळू, मजेशीर, प्रेमाने भरलेलं आणि अधिक चांगलं जाईल अशी आशा आहे".