आमिर खानच्या लेकीच्या एंगेजमेंटमध्ये दिसला इमरान खान, चाहते म्हणाले - सिनेमात कमबॅक कर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:02 PM2022-11-19T17:02:56+5:302022-11-19T17:14:27+5:30

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला.

Aamir khan daughter ira khan engagement function imran khan gets in limelight | आमिर खानच्या लेकीच्या एंगेजमेंटमध्ये दिसला इमरान खान, चाहते म्हणाले - सिनेमात कमबॅक कर

आमिर खानच्या लेकीच्या एंगेजमेंटमध्ये दिसला इमरान खान, चाहते म्हणाले - सिनेमात कमबॅक कर

googlenewsNext

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. साखरपुडेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालं. मुलीच्या साखरपुड्यातील आमिर खानच्या लुकचीही जोरदार चर्चा रंगली. साखरपुड्यात कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होतं. यादरम्यान आमिर खानसोबत त्याचा भाचा  इमरान खानसुद्धा दिसला.  इमरान खान साखरपुड्याच्या ठिकाणी पोहोचात मीडियाचे कॅमेरा त्याच्यावर वळलं.  


पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्लू कलरचा ब्लेझरमध्ये इमरान हँडसम हंक दिसत होता. अनेक दिवसांनंतर अभिनेत्याला पाहून चाहते  खूश झाले. इमरानला पाहून सोशल मीडियावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, "इमरान... तू खूप  हँडसम दिसतो आहेस." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, इमरान मला तुझी खूप आठवण येते. दुसऱ्या एका चाहत्याने ‘इमरान, प्लीज तू चित्रपटांमध्ये कमबॅक कर’, असे लिहिले आहे. 

इमरान खानने २००८ साली 'जाने तू ... या जाने ना' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता. आज इमरान बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर आहे. 

Web Title: Aamir khan daughter ira khan engagement function imran khan gets in limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.