आमिरने केली साक्षीची स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:31 IST2016-07-05T11:01:33+5:302016-07-05T16:31:33+5:30
साक्षी तन्वर दंगल या चित्रपटात आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ती खूपच चांगली अभिनेत्री असल्याचे आमिर सांगतो. साक्षीला ...

आमिरने केली साक्षीची स्तुती
स क्षी तन्वर दंगल या चित्रपटात आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ती खूपच चांगली अभिनेत्री असल्याचे आमिर सांगतो. साक्षीला चित्रपटात घेण्याविषयी आमिरनेच दिग्दर्शक नितेश तिवारीला सांगितले होते. आमिरची आई अनेक मालिका पाहाते. त्यांनी साक्षीच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत आणि त्यांना साक्षी खूपच आवडते. त्यामुळे त्यांनी आमिरला साक्षीविषयी सांगितले आणि आमिरने साक्षीचे नाव या चित्रपटासाठी सुचवले. त्यानंतर नितेशने साक्षीची टेस्ट घेतली आणि चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली. साक्षीसोबत चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता. मला एखाद्या दृश्यासाठी सात-आठ रिटेक घ्यावे लागत असत. पण साक्षी कोणतेही दृश्य एका टेकमध्ये करत असे. तिने व्यक्तिरेखेत स्वतःला झोकून दिले होते. तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली असे आमिर सांगतो.