‘दंगल’मध्ये आमिर ‘हानिकारक बापू’!

By Admin | Updated: November 16, 2016 03:41 IST2016-11-16T03:41:01+5:302016-11-16T03:41:01+5:30

आमिर खानचा आगामी ‘दंगल’चित्रपटातील पहिले गाणे ‘हानिकारक बापू’ रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ आमिरने सोशल मीडियावर

Aamir 'Harmful Bapu' in 'Dangal'! | ‘दंगल’मध्ये आमिर ‘हानिकारक बापू’!

‘दंगल’मध्ये आमिर ‘हानिकारक बापू’!

आमिर खानचा आगामी ‘दंगल’चित्रपटातील पहिले गाणे ‘हानिकारक बापू’ रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ आमिरने सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्या कुणाला आपल्या वडिलांची भीती वाटते, त्यासर्वांसाठी ‘हानिकारक बापू’ हे गाणे असल्याचे आमिरने हे गाणे शेअर करताना म्हटले आहे. ‘दंगल’मध्ये आमिर खान महावीर फोगटच्या भूमिकेत असून आपल्या मुलींनी ‘कुस्तीपटू’ व्हावे यासाठी तो प्रयत्न करीत आहे. आपल्या वडिलांप्रती भावना व्यक्त करताना त्याच्या मुलींने हे गाणे गायले आहे. आमिरसह जायरा वसीम, सुहानी भटनागर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. पहाटे लवकर आपल्या मुलींना उठवून धावायला लावणे, त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे या सर्व गोष्टी आमिर करताना दिसतो. तसेच, त्यांना टीव्हीदेखील पाहू देत नाही. ‘बापू तू सेहत के लिए हानिकारक है’, असे या गाण्याचे बोल आहेत. आमिरने हे गाणे मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात लाँच केले.

Web Title: Aamir 'Harmful Bapu' in 'Dangal'!