‘गिलहरीया’गाण्यात आमिरच्या मुलींची मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:43 IST2016-11-30T17:43:27+5:302016-11-30T17:43:27+5:30
Aamir Khan's Dangal new song Gilehriyaan Released ; दंगलच्या ‘गिलहरीया’ गाण्यात आमिरच्या मुली गीता व बबीता यांची धम्माल मस्ती पाहायला मिळणार आहे.

‘गिलहरीया’गाण्यात आमिरच्या मुलींची मस्ती
आमिर खान प्रोडक्शन व यूटीव्ही मोशन पिक्चर्स निर्मित आगामी ‘दंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. यात आमिर खान प्रमुख भूमिका साकारतो आहे. ‘दंगल’या चित्रपटातील गीतांना प्रितम यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘गिलहरीया’ हे गीत अमिताभ भट्टाचार्य याने लिहिले असून जोनिता गांधी हिच्या आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलेयं. ‘गिलहरीया’ या गाण्यात आमिरच्या (महावीर सिंग फोगट) मुली फातिमा सना शेख (गीता) व सन्या मल्होत्रा (बबीता) मस्ती करताना दिसत आहेत. या गाण्यातून चित्रपटाची क था उलगडण्याचा प्रयत्न केला गेलायं.
"Jo zaika mannmaaniyon ka hai woh kaisa ras bhara hai..."https://t.co/p5PkIRwY4l— Aamir Khan (@aamir_khan) November 30, 2016 ">http://
}}}}"Jo zaika mannmaaniyon ka hai woh kaisa ras bhara hai..."https://t.co/p5PkIRwY4l— Aamir Khan (@aamir_khan) November 30, 2016
‘दंगल’च्या ‘हानिकारक बापू’ व ‘धाकड’या दोन गाण्यांमधून आमिरच्या मुलीचा कुश्तीचा प्रवास कसा सुरू झाला, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर ‘गिलहरीया’ या गाण्यामधून आमिरच्या मुलीचे प्रशिक्षण, दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यामधून केवळ मुलींच्या प्रशिक्षणावर फोकस करण्यात आला आहे हे विशेष. अद्याप आमिरची म्हणजेच महावीर सिंग फोगट यांची बाजू दाखविण्यात आली नाही.