आलिया भटसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये एका महिलेने केलं असं काही; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:48 IST2025-10-02T10:48:28+5:302025-10-02T10:48:49+5:30
आलिया भट (Alia Bhatt) मुंबईत मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या दुर्गा पूजेत सहभागी झाली. या पंडालमध्ये अशी एक घटना घडली, त्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेत्रीचे जोरदार कौतुक होत आहे.

आलिया भटसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये एका महिलेने केलं असं काही; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नंतर आता आलिया भट (Alia Bhatt) मुंबईत मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या दुर्गा पूजेत सहभागी झाली. तिथे तिचा सर्वात चांगला मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीने तिचे स्वागत केले आणि तिला आत घेऊन गेला. यानंतर तिने राणी मुखर्जीची भेट घेतली, जिथे राणीने 'राहाच्या मम्मी'चे खूप कौतुक केले. मात्र, या पंडालमध्ये अशी एक घटना घडली, त्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेत्रीचे जोरदार कौतुक होत आहे.
घडले असे की, आलिया भटने दुर्गा पूजा पंडालमध्ये माता राणीचे दर्शन घेतले. यानंतर ती सगळ्यांना भेटून तेथून निघाली. ती बाहेर येताच तिथे चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. तिचे बॉडीगार्ड्स तिला संरक्षण देत पुढे घेऊन जात होते. पण त्याच क्षणी एका लाल साडीतील महिलेने अभिनेत्रीचा हात जोरजोरात ओढला. त्यामुळे बॉडीगार्ड्स त्या महिलेला मागे ढकलू लागले. मात्र, आलियाने त्यांना थांबवले आणि अगदी शांतपणे परिस्थिती हाताळली. तिच्या याच शांत आणि संयमित वागणुकीमुळे तिचे खूप कौतुक होत आहे.
नेटकऱ्यांनी केलं आलियाचं कौतुक
आलिया भटचा पंडालमधील व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, "इतकं झाल्यावरही तिने खूप आदर दाखवला आणि संयमाने काम घेतले." एकाने लिहिले, "हे खूप अपमानजनक आहे. लोकांना आपली मर्यादा माहीत असायला हवी." तिच्या शांत प्रतिक्रियेबद्दल एकाने म्हटले, "आलियाने परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली." दुसऱ्याने लिहिले, "खूप छान! याला म्हणतात संस्कार."
या घटनेवरून 'जया बच्चन' यांचा नेटकऱ्यांनी केला उल्लेख
याच घटनेवरून काही लोकांनी जया बच्चन यांचा संदर्भ देत आपली नाराजी व्यक्त केली. एका युजरने लिहिले, "जया बच्चनच बरोबर आहेत, अशा चुकीच्या वागणुकीसाठी." दुसऱ्याने म्हटले, "तुम्ही पाहिले ना की त्या लाल साडीतील महिलेने आलियाचा हात कसा ओढला आणि लोक जया बच्चन यांच्यावर आरोप करतात. खासगी जागेचा आदर करा."