संजय लीला भन्साळींनी ऐश्वर्यासाठी खरेदी केल्या होत्या 600 साड्या; अभिनेत्रीसाठी खर्च केला पाण्यासारखा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:06 AM2024-05-04T10:06:34+5:302024-05-04T10:07:14+5:30

Aishwarya rai: ऐश्वर्यासाठी या साड्या खास कोलकत्तावरुन खरेदी करण्यात आल्या होत्या.

a-big-revelation-has-been-made-about-bollywood-actress-aishwarya-rais-film | संजय लीला भन्साळींनी ऐश्वर्यासाठी खरेदी केल्या होत्या 600 साड्या; अभिनेत्रीसाठी खर्च केला पाण्यासारखा पैसा

संजय लीला भन्साळींनी ऐश्वर्यासाठी खरेदी केल्या होत्या 600 साड्या; अभिनेत्रीसाठी खर्च केला पाण्यासारखा पैसा

बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. अभिनयासोबतच ऐश्वर्याच्या सौंदर्याचीदेखील कायम चर्चा रंगत असते. त्यामुळे केवळ देशातच नाही तर पार सातासमुद्रापारपर्यंत तिची लोकप्रियता आहे. ऐश्वर्याने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर, उमराव जान, देवदास यासारखे तिचे अनेक सिनेमा गाजले. यात खासकरुन देवदास हा सिनेमा तर आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. विशेष म्हणजे या सिनेमातील ऐश्वर्याचा लूक प्रचंड लोकप्रिय झाला होता. मात्र, हा लूक करण्यासाठी तिने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. तिने या सिनेमासाठी चक्क ६०० साड्यांची खरेदी केली होती.

देवदास या सिनेमात ऐश्वर्या राय, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित  यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता. हा सिनेमा तयार करण्यासाठी जवळपास ५० कोटी रुपये खर्च झाले होते. यात ऐश्वर्याच्या लूकवर सर्वाधिक लक्ष देण्यात आलं होतं. त्यामुळेच भन्साळींनी ऐश्वर्यासाठी तब्बल ६०० साड्या खरेदी केल्या होत्या.

'तिला हात कशाला लावताय?' संजय लीला भन्साळींवर भडकला होता सलमान, सेटवर केली होती कानउघडणी

अलिकडेच प्रसिद्ध डिझायनर नीता लूल्ला यांनी एक मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये त्यांनी 'देवदास' सिनेमाविषयी काही खुलासे केले. यावेळी बोलत असतांना तिने संजय लीला भन्साळींसोबत मी ऐश्वर्यासाठी ६०० साड्यांची खरेदी केली होती. तसंच काही साड्यांचं कॉम्बिनेशन करुन नव्या स्टाइलच्या साड्याही तयार केल्या होत्या. या साड्या कोलकत्तावरुन खरेदी करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, देवदास या सिनेमासाठी ऐश्वर्याला पारोचा लूक करण्यासाठी दररोज तीन तास लागायचे. परंतु, या सिनेमातून ऐश्वर्याने प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर यशस्वीरित्या छाप पाडली.

Web Title: a-big-revelation-has-been-made-about-bollywood-actress-aishwarya-rais-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.