Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:42 IST2025-11-12T08:42:13+5:302025-11-12T08:42:56+5:30

Actor Govinda hospitalized in Mumbai after fainting at home : अभिनेता गोविंदा मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील त्याच्या घरी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला तातडीने जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

61-year-old Actor Govinda's health suddenly deteriorated, he became unconscious, admitted to Juhu hospital | Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल

Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा ‘नंबर वन’ स्टार गोविंदाच्या प्रकृतीने सगळ्यांना चिंतेत टाकले आहे. ६१ वर्षीय गोविंदा मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील त्याच्या घरी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला तातडीने जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे कायदेशीर सल्लागार आणि मित्र ललित बिंदल यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

ललित बिंदल यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, मंगळवारी रात्री गोविंदा मुंबईतील त्याच्या निवासस्थानी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्याला औषध देण्यात आले आणि रात्री १ वाजता त्याला इमरजन्सीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. ललित बिंदल यांनी सांगितले की, अभिनेत्याच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत, ज्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

८.३० वाजताच्या सुमारास अचानक झाला बेशुद्ध 
गोविंदा मंगळवारी रात्री ८.३० वाजता अचानक बेशुद्ध झाला, त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याला काही औषधे देण्यात आली आणि औषध घेतल्यावर गोविंदाच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचे सांगितले जात आहे. पण रात्री सुमारे १२.३० वाजता त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर रात्री सुमारे १ वाजता त्याला मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे अभिनेता
गोविंदा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि लवकरच त्याची हेल्थ अपडेट दिली जाईल. नुकतेच गोविंदा ही-मॅन धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता, जिथून त्याचा व्हिडीओही समोर आला होता. या दरम्यान गोविंदा खूप भावुक दिसला होता. 

एक वर्षापूर्वी गोविंदाच्या गुडघ्याला लागलेली गोळी  
तुम्हाला माहिती असेलच, एक वर्षापूर्वीही गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेव्हा त्यांच्याच परवानाधारक पिस्तुलातून त्याला गोळी लागली होती. गोविंदा मुंबईतील त्याच्या घरात रिव्हॉल्व्हर ठेवत असताना ती त्याच्या हातातून निसटली आणि गोळी चालली, जी त्यांच्या डाव्या गुडघ्यात लागली. या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे ऑपरेशननंतर त्याच्या गुडघ्यातून गोळी काढण्यात आली होती.
 

Web Title: 61-year-old Actor Govinda's health suddenly deteriorated, he became unconscious, admitted to Juhu hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.