5216_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:00 IST2016-04-17T09:30:02+5:302016-04-17T15:00:02+5:30

पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणकडे भारतामध्ये विविध रंग, संस्कृती, भाषा, परंपरा, श्रद्धा आणि धर्म आहेत. इमारतींची रचना आणि वास्तूकला देखील वेगवेगळ्या आहेत. यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय भारताचा असणारा श्रीमंत इतिहास आणि इतर सिद्धांत पाहण्याजोगे आहेत. अशाच काही स्मारकांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5216_article | 5216_article

5216_article

र्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणकडे भारतामध्ये विविध रंग, संस्कृती, भाषा, परंपरा, श्रद्धा आणि धर्म आहेत. इमारतींची रचना आणि वास्तूकला देखील वेगवेगळ्या आहेत. यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय भारताचा असणारा श्रीमंत इतिहास आणि इतर सिद्धांत पाहण्याजोगे आहेत. अशाच काही स्मारकांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
रवींद्रनाथ टागोर यांच्यामते ताजमहल म्हणजे ‘काळाच्या गालावरील अश्रू’ होय. १९८३ पासून हे ठिकाण जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील आगरा येथे उभारण्यात आलेला संगमरवरी बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना होय. १६४८ साली मुघल सम्राट शहाजहानने याची निर्मिती केली. १६३० साली शहाजहानची प्रिय पत्नी मुमताज महल वारल्यानंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ही सुंदर इमारत बांधली. १६३१ साली याची सुरुवात झाली. १७ वर्षे याचे बांधकाम सुरू होते. २२ हजार नोकर यासाठी राबत होते. पंजाबहून सूर्यमणी, तिबेटहून नीलमणी, श्रीलंकेहून आकाशी रंगाचे मणी, चीनहून स्फटीक, त्याचपद्धतीने २८ विविध प्रकारचे उच्च दगड वापरण्यात आले आहेत. त्या काळी यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च आला होता. जगातील सात आश्चर्यापेैकी हे एक असून, दरवर्षी सुमारे ३० लाखाहून अधिक लोक भेट देत असतात.

Web Title: 5216_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.