​अभिनेत्री ऋचा दीक्षितच्या घरी ५० लाखाची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:45 IST2016-07-20T11:15:17+5:302016-07-20T16:45:17+5:30

सावधान इंडिया मध्ये काम करणारी अभिनेत्री ऋचा दीक्षितच्या घरातून चोरट्यांनी साखरपुड्यासाठीचे सुमारे ५० लाखाचे दागिने चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. ...

50-rupee theft in actress Richa Dixit's house | ​अभिनेत्री ऋचा दीक्षितच्या घरी ५० लाखाची चोरी

​अभिनेत्री ऋचा दीक्षितच्या घरी ५० लाखाची चोरी


/>सावधान इंडिया मध्ये काम करणारी अभिनेत्री ऋचा दीक्षितच्या घरातून चोरट्यांनी साखरपुड्यासाठीचे सुमारे ५० लाखाचे दागिने चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. ती घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. कपाटाच्या लॉकरमध्ये रोख रक्कम ठेवली होती. संधी साधून चोरट्यांनी कपाटातील ऐवज चोरुन नेला.
ऋचाचे वडील अन्न पुरवठा विभागात लिपिक म्हणून काम करतात. ऋचाने सीआयडी, सावधान इंडिया, क्राईम पेट्रोलमधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. साखरपुडा आटोपल्यानंतर ऋचा आणि तिचे कुटुंबीय एका दिवसासाठी राजस्थानला फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना झालेल्या चोरीची माहिती मिळाली. या दरम्यान ऋचाने घराची चावी शेजाºयांकडे दिली होती. ऋचाच्या वडीलांनी याची पोलिस तक्रार दिली आहे.

Web Title: 50-rupee theft in actress Richa Dixit's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.